Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : साडेतीन मिनिटांचा ट्रेलरही झेपत नाही! 'भाईजान' हे काय केलंय?

भाईजान सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान का या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer esakal

isi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : भाईजान सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान का या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरला भलेही नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असला तरी अनेकांनी तो पाहून नाकं मुरडली आहे. बऱ्याच कालावधीनंतर सलमानच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता होती.

चाहत्यांनी नेहमीप्रमाणे लाडक्या सलमानवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. मात्र बाकीच्यांनी त्याला धारेवर धरले आहे. त्यांच्या मते सलमाननं जे काही बनवले आहे ते पाहताना कमालीची निराशा झाली. एवढ्या कालावधीनंतर तो समोर आला आणि त्यातही त्याच्या कलाकृतीनं आमची निराशा झाली आहे. सलमानच्या किसी का भाई किसी की जानचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो ट्रेडिंगचा विषय होता.

आता तर सलमानवर वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये सलमाननं एका ठोशामध्ये इमारत पाडल्याचे चाहत्यांना नवल वाटले आहे. इतरांनी सलमान आणि पुजा हेगडे यांच्या केमिस्ट्रीवरुन त्यांना ट्रोल केले आहे. त्यामुळेच की काय ट्रेलरची जी उत्सुकता होती त्यावर पाणी फेरले गेले आहे. यापूर्वी देखील या चित्रपटातील गाण्यांवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. आपले वय काय आणि आपण करतो काय असे प्रश्न सलमानला नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली होती.

सलमान या वयात तू जे काही करतो आहे हे तुला पटते का, तू बॉलीवूडचा सिनिअर हिरो आहेस तेव्हा तुला वेगळ्या भूमिका का नाही कराव्याशा वाटत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सलमानला दिल्या होत्या. त्यानंतर तीन ते चार दिवसांपूर्वी लुंगी डान्सचे गाणे प्रदर्शित झाले. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला, मात्र त्यावरुन सलमानच्या लुंगी डान्सनं वेगळाच वाद समोर आला होता. अनेकांना तो डान्स आवडला नसल्याचे त्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer
Salman Khan: भाईजानसाठी पब्लिक खुळी! किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com