esakal | कोण आहे आमिरच्या मुलीचा मराठी बॉयफ्रेंड? कशी झाली भेट?
sakal

बोलून बातमी शोधा

ira khan and nupur shikhare

इरा खानने तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केल्यापासून तिचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये आहे.

कोण आहे आमिरच्या मुलीचा मराठी बॉयफ्रेंड? कशी झाली भेट?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

सोशल मीडियावर सेलिब्रिटींची जितकी चर्चा असते, तितकीच स्टारकिड्सचीही चर्चा पाहायला मिळते. आमिर खानची मुलगी इरा खानने तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केल्यापासून तिचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये आहे. फिटनेस प्रशिक्षक नुपुर शिखरेसोबतचे फोटो पोस्ट करत इराने तिच्या प्रेमाची कबुली दिली. इराचा हा मराठी बॉयफ्रेंड कोण आहे ते जाणून घेऊयात..

कोण आहे नुपुर शिखरे?
नुपुर शिखरे हा Fitnessism चा संस्थापक असून फिटनेस प्रशिक्षक आहे. नुपुर आमिर खानचाही फिटनेस प्रशिक्षक होता. लॉकडाउनदरम्यान नुपुरने इरालासुद्धा ट्रेनिंग दिली होती. नुपुर बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या सेलिब्रिटींचा फिटनेस प्रशिक्षक होता. यामध्ये सुष्मिता सेनचाही समावेश आहे. 

हेही वाचा : दिया मिर्झा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा पती?

कशी झाली आमिरच्या मुलीशी भेट?
लॉकडाउनदरम्यान फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी इराने नुपुरची भेट घेतली. फिटनेस प्रशिक्षणादरम्यानच इरा आणि नुपुर एकमेकांच्या प्रेमात पडले. याआधीही इराने नुपुरसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र 'प्रॉमिस डे'निमित्त तिने तिचं नातं जगजाहीर केलं. 

हेही वाचा : शिवीगाळचे मेसेज पाठवणाऱ्याला दीपिकाने सुनावलं; शेअर केला स्क्रीनशॉट

डिसेंबर २०१९ मध्ये झालं होतं इराचं ब्रेकअप
इरा नेहमीच तिच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त झाली आहे. याआधी ती मिशाल कृपलानीला डेट करत होती. त्याच्यासोबतचेही अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र डिसेंबर २०१९ मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर तिने त्याच्यासोबतचे सर्व फोटो डिलिट केले. इरा आणि मिशाल दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 

loading image