esakal | दिया मिर्झा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा पती?
sakal

बोलून बातमी शोधा

dia mirza

हा विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे.

दिया मिर्झा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा पती?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठीतील कलाकारांच्या विवाहसोहळ्याची बातमी समोर येत असतानाच आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा दुसऱ्यांना लग्न करणार असल्याचं समजतंय. येत्या १५ फेब्रुवारी रोजी दिया व्यावसायिक वैभव रेखीशी लग्नगाठ बांधणार आहे. हे विवाहसोहळा मुंबईतच पार पडणार आहे. 

'स्पॉटबॉय ई'ने दिलेल्या वृत्तानुसार, दियाच्या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय व जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित असतील. वैभव रेखी हा मुंबईतील व्यावसायिक असून पाली हिल याठिकाणी तो राहतो. 

हेही वाचा : शाहरुखपासून दीपिकापर्यंत.. अनुष्काच्या वामिकासाठी सेलिब्रिटींनी पाठवले 'हे' महागडे गिफ्ट्स

साहिल संघाला दिला होता घटस्फोट
२०१९ मध्ये दियाने तिच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सर्वांना सांगितली होती. अकरा वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांच्या संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. दिया आणि साहील यांनी एकत्र व्यवसायाला सुरुवात केली होती आणि तेथूनच या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं होतं. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा : स्वप्नालीच्या हातावर रंगली आस्तादच्या नावाची मेहंदी

'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटामुळे दिया लोकप्रिय झाली. तिने 'लगे रहो मुन्नाभाई', 'संजू', 'थप्पड' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री म्हणून दियाला बॉलिवूडमध्ये फारसं यश लाभलं नाही. अलीकडेच ती निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. 
 

loading image