Sunny Leone Birthday: लग्नाआधी डॅनियलला सनी लियोनी वाटली होती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Know About Sunny Leone's Love Story on her Birthday

Sunny Leone Birthday: लग्नाआधी डॅनियलला सनी लियोनी वाटली होती..

सनी लियोनी ही अभिनेत्री कोणाला माहिती नसेल असा कोणी शोधूनच मिळेल.तिच्या चित्रपटांनी सगळीकडे एके काळी भलतीच खळबळही उडालेली होती.(Sunny Leone)आज या अभिनेत्रीचा वाढदिवस.तीच्या खऱ्या जीवनातली तीची लव स्टोरी ऐकाल तर कळेल की त्यातही ट्वीस्ट होता.एका मुलाखतीदरम्यान तीने ते उघड केले.ज्या अभिनेत्रीने अनेक बोल्ड सीन्स केले आहेत तिच्या खऱ्या जीवनातील तिची लव स्टोरी काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता जवळपास सगळ्यांनाच असेल.तीच्या वाढदिवशी जाणून घेऊया तीची लव स्टोरी.

सनी लियोनीला बघून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या अभिनेत्रीने चाळीसी ओलांडलेली आहे.तिचा एक्केचाळीसवा वाढदिवस ती साजरा करतेय.सनी लियोनीचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आबे असे आहे.(Birthday)तिचा जन्म एका शिख कुटुंबात झालाय.तसेच तिच्याकडे कॅनडा आणि अमेरिकन नागरिकत्व आहे.सनी लियोनीच्या पतीचं नाव 'डेनियल वेबर' आहे.डेनियलशी पहिल्यांदाच झालेल्या भेटीचा एक आठवणीत राहाणारा किस्सा तिने सांगितलाय.डेनियल आणि सनीचे लव मॅरेज झालेले आहे.

लॉस वेगसमधे सनी एक शूट होत.त्यावेळी सनी तीच्या मैत्रिणीसोबत शूटसाठी गेली होती.तेव्हा तिचा नुकताच ब्रेकअप झाला होता.त्यामुळे ती निराश होती.ब्रेकअपनंतर एकटी पडलेल्या सनीने खूप फिरायचं,मजा करायची,वेगळ्या वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायची असं ठरवलं होतं.त्यातच त्या शूटदरम्यान तीची नजर डॅनियलवर पडली आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले ते "वाह !बॅड बॉय".तीने त्यावेळी त्याला बॅड बॉय जरी म्हटलं असेल तरी तो त्याऊलट निघाला असेही ती सांगते.

जेव्हा सनीला पहिल्यांदाच डॅनियलनेही बघितले होते त्यावेळी ती तिच्या मैत्रिणीच्या हातात हात घालून होती.त्यामुळे तेव्हा डॅनियल सनीला लेसबियनच समजला होता.पण शूटदरम्यान डॅनियलचा तो गैरसमज दूर झाला होता असेही ती म्हणाली.शूटदरम्यान डॅनियल हाच आपला योग्य जोडीदार आहे याची सनीला जाणीव झाली.त्यांनर त्यांची लव स्टोरी सुरू झाली होती.

Web Title: Know About Actress Sunny Leones Love Story On Her Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top