
Bigg Boss 16: बिग बॉस १६ साठी किती मानधन घेणार सलमान, थीम काय असणार? जाणून घ्या सगळं
बिग बॉस म्हटलं की सलमान आणि सलमान म्हटलं की बिग बॉस असं काहीसं समिकरण प्रेक्षकांना कायमच लक्षात राहिल. कलाकारांचा मनोरंजक मेलोड्रामा प्रेक्षकांना फक्त याच शोमध्ये बघायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांचा हा अत्यंत आवडीचा शो आहे. त्यामुळे या शोच्या प्रत्येक सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. आता सगळ्यांच्या नजरा बिग बॉस सीजन १६ साठी खिळून आहेत. मेकर्सही या शोच्या तयारीला लागले असल्याची माहिती पुढे येतेय. (know Bigg Boss 16: theme, salman salary and contestants)
बिग बॉस शोला घेऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचं वेडेपण आहे. येणाऱ्या शोचं थिम 'अंडर वॉटर'(under water) असू शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. बिग बॉसच्या भितींवर पाण्यात राहाणारे प्राण्यांचे पोस्टर दिसणार आहेत. या शोचं फोकस पाण्यात असणार आहे. या शोचा प्रोमो ऑगस्टमध्ये शूट केला जाऊ शकतो. मेकर्स लवकरच शोच्या कंटेस्टंटशी संपर्क साधणार आहे.
ऑक्टोबरमध्ये सुरू होणार शो
शोच्या सुरू होण्याची अधिकृत तारीख अजून पुढे आली नसली तरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शो सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. या शोमध्ये शाइनी अहूजा, जन्नत जुबैर, मुनव्वर फारूकी, दिव्यांका त्रिपाठी, कावेरी प्रियम, अर्जुन बिजलानी ,सान्या ईरनी आणि बरीच नावं चर्चेत आहेत.
हेही वाचा: 'या' 17 सेलेब्सना 'Big Boss' ची ऑफर? प्रसिद्ध TV कलाकार,ग्लॅमर गर्लही यादीत
शोसाठी शंभर कोटी मानधन घेणार सलमान
या शोच्या प्रदर्शित होण्याबरोबरच सलमानचीही चर्चा सुरू आहे. या शोला सलमान होस्ट करणार असून या शोसाठी सलमान मोटी रक्कम घेणार असल्याचं कळतंय. यावेळी सलमान बिग बॉससाठी १०० कोटी एवढं मानधन घेतोय. मागल्या वेळी हा शो फार चांगला टीआरपी कमावू शकला नाही. त्यामुळे यावेळी जोरदार तयारी सुरू आहे.
Web Title: Know Big Boss 16 Salman Salary Themeshow Promo And Everything About Show
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..