Koffee With Karan7: अनन्या सोबतच्या ब्रेकअपवर ईशाननं सोडलं मौन;म्हणाला,'मला तिने...'

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शो मध्ये ईशान आपल्या 'फोन भूत' सिनेमातील कलाकार कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत गेस्ट म्हणून आला होता.
Koffee With karan 7: Ishaan Khatter comments on break-up with Ananya Panday
Koffee With karan 7: Ishaan Khatter comments on break-up with Ananya PandayInstagram

Ishaan Khatter & Ananya Panday Broke-up: करण जोहरचा(Karan Johar) 'कॉफी विथ करण ७' (Koffee WIth karan 7) हा चॅट शो जेव्हापासनं सुरू झालाय तेव्हापासून सेलिब्रिटींचे अंतर्गत किस्से चाहत्यांसाठी शॉकिंग ठरत आहेत. करण जोहर अगदी सेलिब्रिटींच्या बेडरुमपर्यंत पोहोचून मसालेदार कॉन्टेन्ट मिळवत शो चा टीआरपी वाढवताना दिसत आहे. अर्थात काहीजण या चॅट शो ची मजा अनुभवतायत तर काहींना मात्र शो मधील कमरेखालचे विनोद ज्याला म्हणतात असे किस्से खटकताना दिसत आहेत. असो,आता या आठवड्यात शो चा नवीन एपिसोड स्ट्रीम होणार आहे. या एपिसोडमध्ये कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी ही 'फोन भूत' ची टीम आली होती. त्यांनी भरपूर धमाल केलीच,पण अनेक वैयक्तिक गोष्टीबाबतही खुलासे केले आहेत.

Koffee With karan 7: Ishaan Khatter comments on break-up with Ananya Panday
'लाइगर'चा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ अडचणीत, सोडावं लागलं मुंबईतलं आलिशान घर

या भागात करण जोहर सिद्धांत चतुर्वेदीला विचारतो,'तू सिंगल आहेस का?' तेव्हा सिद्धांत लगेच उत्तर देत म्हणतो,'हो,मी सिंगल आहेच पण माझ्यासोबत राहून आता ईशानही सिंगल झाला आहे'. बस्स...करणला धागा मिळाला अन् त्यानं मग ईशानला बोलतं केलंच. करणने आपली गाडी ईशानकडे वळवली आणि त्यानं थेट ईशानला अनन्या पांडे(Ananya Panday)सोबतच्या ब्रेकअप वरनं प्रश्न केला.

Koffee With karan 7: Ishaan Khatter comments on break-up with Ananya Panday
'ब्रह्मास्त्र'ला बॉयकॉट करणाऱ्यांवर भडकलेल्या स्वराची जीभ घसरली;म्हणाली,'धंदा...'

करणच्या या ब्रेकअप प्रश्नावर ईशान म्हणाला,''मी ब्रोकअप केलं?', कारण करण तुच म्हणालास तुझ्या कार्यक्रमात की तिनं माझ्यासोबत ब्रोकअप केलं,आठवलं तुला?''. ईशानने करणला आठवण करुन दिली जेव्हा अनन्या विजय देवरकोंडासोबत शो मध्ये आलेली त्यावेळची. तेव्हा करणनं अनन्याला विचारलं होतं की, 'तू ईशानसोबत ब्रोकअप केलंस का?' यावेळी ईशाननं करणला सांगितलं की मी तिला खूप जवळून ओळखायचो. तेव्हा करणनं वातावरण हलकफुलकं करण्यााठी पटकन म्हटलं की हे ब्रेकअप दोघांच्या सहमतीनं जेव्हा होतात तेव्हा नातं बिघडत नाही,ते पुढील आयुष्यातही चांगलं राहतं, त्यानं मुद्दामहून उगाच कतरिनाला देखील हे चांगलंच माहित असावं असं ऐकवलं.

Koffee With karan 7: Ishaan Khatter comments on break-up with Ananya Panday
KBC 14 :'माझे अवयव एकेक करुन निकामी होत होते...',अमिताभचा मन सुन्न करणारा अनुभव

ईशान याच विषयाला पुढे नेत म्हणाला, ''एकदा ब्रेकअप झालं की झालं, मग ते पहिलं कुणी केलं, किंवा कुणाचं नक्की कुणासोबत झालं याला अवाजवी महत्त्व कशाला द्यायचं''. त्यासोबतच आपण सध्या सिंगल असल्याचं त्याने म्हटलं.

अनन्याने देखील 'कॉफी विथ करण 7' च्या एपिसोडमध्ये आपण एकासोबत रिलेशनशीपमध्ये असताना विजय देवकोंडासोबतही Sushi date वर गेल्याचं म्हटलं होतं. हे ईशानसमोर करणनं बोलून दाखवल्यावर ईशान म्हणाला'...प्रेम..प्रेम आणि काय.' आणि मस्करीत वेळ मारुन नेली.

ईशान आणि अनन्याची लव्हस्टोरी 'खाली पीली' च्या सेट वर सुरू झाली होती. दोघांनी सिनेमात एकत्र काम केलं आणि त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. तीन वर्ष डेट केल्यानंतर हे कपल आता वेगळं झालं आहे. याचं कारण जरी कुणी स्पष्ट करत नसलं तरी त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहते मात्र खट्टू झालेयत. ईशानसोबत ब्रेकअप झाल्यावर अनन्याचे नाव आता आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जात आहे. आणि स्वतः करणनेच याचा खुलासा आपल्या शो मध्ये अनन्यासमोर केला होता.

ईशान खट्टर आता पिप्पा या सिनेमात दिसणार आहे. ज्यात त्यानं ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांची भूमिका साकारली आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच,त्याचा फोनभूत सिनेमा देखील आपल्या भेटीस येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com