Kokan Hearted Girl Video: मला ईच्छामरण हवंय, ज्येष्ठ अभिनेत्याने कोकण हार्टेड गर्ल समोर मांडली मनातली खंत

अंकीता सोबत मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते दिसत आहेत.
kokan hearted girl ankita walawalkar shared video of veteran marathi actor who search for work
kokan hearted girl ankita walawalkar shared video of veteran marathi actor who search for work SAKAL

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Video News: कोकण हार्टेड गर्ल अंकीता वालावलकर सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत असते. अंकीताचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात.

अंकीता ही रील स्टार म्हणुन जितकी लोकप्रिय आहे तितकीच ती अनेकदा सामाजिक भानही जपत असते.

नुकताच अंकीताचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत अंकीता सोबत मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते दिसत आहेत.

(kokan hearted girl ankita walawalkar shared video of veteran marathi actor who search for work )

kokan hearted girl ankita walawalkar shared video of veteran marathi actor who search for work
Jawan Prevue Shah Rukh Khan: टकलु असुनही हॅंडसम दिसतोय, शाहरुखच्या जवान 'बाल्ड' लुकवर जनता दिवानी

अंकीताने एक व्हिडीओ शेअर केलाय त्यात ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर दिसत आहेत. मनमोहन यांनी अंकीताकडे काम मागीतलं. मनमोहन एकटे राहतात.

मनमोहन यांचं लग्न झालं नाही की त्यांच्याकडे कुटूंब नाही. त्यांनी ईच्छामरणाची गोष्ट अंकीताला बोलुन दाखवली.

अंकीताला मनमोहन यांची कहाणी ऐकुन भरुन आलं. तिने पुढे रील शेअर करत अंकीताने मनमोहन यांची कहाणी सर्वांसमोर मांडली.

अंकीता लिहीते.. माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली.मला काम हवंय!!

ही वाक्य मला झोपू देणार नाहित सो मी ही रील बनवण्याचा निर्णय घेतला

वास्तव हे आहे की टीव्ही असो की बॉलीवूड ही इंडस्ट्री रिलेशनशिप बिझनेस आहे.

आपण प्रतिभावान असणे आणि आपली काम बंद करणे ही किमान गोष्ट आहे. आपल्याला भूमिकांसाठी शिफारस करतील असे नातेसंबंध विकसित आणि टिकवून ठेवावे लागतील.

kokan hearted girl ankita walawalkar shared video of veteran marathi actor who search for work
Samantha Cryptic Note: गेले ६ महिने अत्यंत वेदनादायी, समंथाच्या पोस्टने चाहत्यांना काळजी

सर्व नाती जोपासण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही कलाकार पार्टीसाठी बाहेर जातात आणि चांगली वेशभूषा करताना पाहतात तेव्हा तुम्हाला खरे काम मिळते. पार्टीला जाणे हे महत्वाचे काम असते.

सारांश... प्रत्येक कामासाठी बरेच कलाकार असतात. प्रतिभा अप्रासंगिक आहे. मेहनत दिली आहे. नात्याची दारे उघडतात. नातेसंबंध संधी देतात. नातेसंबंध म्हणजे सर्वकाही.

हा माझा वैयक्तिक अनुभव आहे .. मी चूक असल्यास मला दुरुस्त करा. अशी पोस्ट अंकीताने लिहीली आहे.

मनमोहन यांनी हिंदी - मराठी मालिकांमध्ये छोट्या छोट्या भुमिका साकारल्या आहेत. आजही त्यांच्यातला अभिनेता त्यांना स्वस्थ बसु देत नाही, ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. पण या वयात ईच्छा असुनही त्यांना काम मिळत नाही ही खेदाची गोष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com