कोंकणा सेनशर्माला वाटतेय भीती;म्हणाली ''माझ्या मुलाने...''

अभिनेत्रीनं एका मुलाखतीत आपल्या मुलाला घेऊन केलं मोठं वक्तव्य...
Konkona Sensharma with her son Haroon.
Konkona Sensharma with her son Haroon. Google
Updated on

कोंकणा सेन शर्मा(Konkona Sensharma) ही अशी अभिनेत्री आहे जिनं बॉलीवूडमध्ये पदार्पणातच नॅशनल अॅवॉर्ड जिंकण्याचा बहुमान मिळवला. तिच्या आईनेच दिग्दर्शित केलेल्या 'अय्यर' या सिनेमातील भूमिकेसाठी तिला नॅशनल अॅवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर केलेल्या प्रत्येक सिनेमातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत सा-यांनीच खूप कौतूक केलं. तिनं सिनेमा कधी फारसा लीड केला नाही तरी त्याच्यातील तिने साकारलेल्या भूमिकेला एक विशेष महत्त्व ती प्राप्त करून देते ते तिच्या अभिनयानं. आजही 'पेज ३' सिनेमात तिनं साकारलेली जर्नलिस्ट सर्वात आधी पटकन आठवते.

Konkona Sensharma with her son Haroon.
रितेश-जेनेलियाचा आणखी एक भन्नाट व्हिडीओ; चाहत्यांची हसून पुरती वाट...

असो हे सगळं सागायचं कारण हेच की नॅशनल अॅवॉर्डपासून अनेक इतर मोठ्या सन्मानांवर आपलं नाव कोरणा-या कोंकणा सेनशर्माला मात्र सिनेमा करताना एक मोठी भीती वाटतेय. तिनं एका मुलाखतीत याविषयी स्पष्ट केलं. ती म्हणाली,''मला हिंदी सिनेमांचे मोठ-मोठे सलग डायलॉग बोलणं म्हणजे कर्मकठीण काम वाटतं. एका क्षणी मला त्यांची भीती वाटते. खरंतर माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना मी घाबरते पण हिंदी डायलॉग ही मोठी भीती मला कायम सतावतेय. मी सिनेमाचे शूट सुरू होण्याच्या खूप दिवस आधीपासून डायलॉगच्या पाठांतराची तयारी सुरू करते. इतकी मी त्यांना घाबरते. पण तेव्हा तिनं आवर्जुन नमूद केलं, ही मोठी भीती माझ्या मनातून काढायला मला माझ्या दहा वर्षाच्या मुलाने खूप मदत केली. तो होता म्हणून मी या भीतीपासून दूर होवू शकले''.

Konkona Sensharma with her son Haroon.
कंगना सुधारली;करिनाच्या पोस्टवर केलेली कमेंट नेटक-यांना भावली...

कोंकणा सेनने अभिनेता रणवीर शौरीसोबत २०१० मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी 'हरून' ठेवले. पुढे कोंकणा २०१५ मध्ये रणवीर शौरीपासून विभक्त झाली,मात्र २०२० मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मुलाची कस्टडी या दोघांनी विभागून घेतली आहे. तिच्या आगामी सिनेमाचं नाव 'कुत्ते' आहे. या सिनेमात तिच्यासोबत अर्जुन कपूर,राधिका मदन,नसिरुद्दिन शहा हे कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com