क्रांती प्रकाश झा साकारणार स्वामी रामदेव 

- अरुण सुर्वे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

"एमएस धोनी' फेम अभिनेता क्रांती प्रकाश झा आता स्वामी रामदेव यांची भूमिका साकारणार आहे. ते दिसायला रामदेवबाबांसारखे असून त्यांच्याप्रमाणेच कठीण योगासने अगदी सहजपणे करू शकतात. "स्वामी रामदेव - एक संघर्ष' या मालिकेत स्वामी रामदेव यांच्या अज्ञातवासातून एक नावाजलेले विख्यात गुरू, मोठे व्यावसायिक आणि राष्ट्रीय आयकॉन बनण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास रेखाटण्यात आला आहे. यात मालिकेची सहनिर्मिती अजय देवगण फिल्म प्रॉडक्‍शन्स आणि वॉटरगेट प्रॉडक्‍शन यांची आहे. 

या मालिकेसाठी प्रॉडक्‍शन हाऊसला स्वामी रामदेव यांच्यासारखा दिसणारा आणि हावभाव अगदी उत्तमपणे पडद्यावर साकारू शकेल, अशा ताज्या चेहऱ्याची गरज होती. अखेर ती गरज क्रांती प्रकाश झा यांनी पूर्ण केली. याबाबत क्रांती प्रकाश झा म्हणाले, ""स्वामी रामदेव यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साकारणे हे एक आव्हान आहे. उत्तम अभिनय करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

Web Title: Kranti Prakash Jha to play Baba Ramdev