Krishna Abhishek: कृष्णा अभिषेकने केले कपिल शर्मा शोमध्ये धमाकेदार पुनरागमन; व्हिडिओ व्हायरल

गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल शर्मा हा त्याच्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
krishna abhishek
krishna abhishekSakal

गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल शर्मा हा त्याच्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे कपिल शर्मा याच्या याशोमध्ये अनेक स्टार हजेरी लावतात. कृष्णा अभिषेकने या शो मध्ये पुनरागमन केले आहे.

काही काळापासून सपनाची भूमिका साकारणारा अभिनेता कृष्णा अभिषेक या शोमध्ये खूश नव्हता आणि त्यामुळे तो शो पासून दूर होता. पण आता तो शोमध्ये परतला आहे. त्याने पैशांमुळे शो सोडला आणि त्याच्या आणि शोमध्ये कॉन्ट्रॅक्टबाबत काही समस्या निर्माण झाल्या होत्या. आता तो शोमध्ये परतला असून त्याने एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

कृष्णा अभिषेक शोमध्ये परतल्यापासून शोमध्ये आनंदाची लाट कशी पसरली आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सपनाच्या भूमिकेत ती इतक्या दिवसांनी रंगमंचावर दाखल झाली तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागली. प्रेक्षकांनीही आनंदाने उड्या मारल्या आणि कृष्णाचे भव्य स्वागत करण्यात आले. सपना झाडू घेऊन स्टेजवर प्रवेश करते आणि तिची आवडती डान्स स्टेप करताना दिसते.

krishna abhishek
Aishwarya Rai: ऐश्वर्याला तब्बल 24 वर्षानंतर आठवला आपला आणि सलमानचा हा सिनेमा... ऐकून सगळेच हैराण

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये किकू शारदा देखील त्याचा मित्र आणि सहकलाकार कृष्णा अभिषेकचे मागून स्वागत करत आहे आणि त्याला चीअर करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच कृष्णाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'सपना परत आली आहे. एवढं प्रेम दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांच्या परिवाराचे खूप खूप आभार. लव्ह यू कपिल शर्मा.'

चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये कृष्णाचे स्वागतही केले असून त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले - ये हुई ना बात. आता मजा येईल. याशिवाय आणखी एका व्यक्तीने लिहिले - शो तुझ्याशिवाय चालत नव्हता, शेवटी तुला बोलावलेच. आणखी एका व्यक्तीने लिहिले - आता कपिल शर्मा शो पाहणे पुन्हा सुरू करावे लागेल. सपना मी तुला खूप मिस केलं.

याशिवाय सपनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. शोबद्दल बोलायचे झाले तर, कृष्णाशिवाय चाहत्यांनाही शोचा पूर्ण आनंद घेता आला नाही. आता सपनाच्या आगमनाने पुन्हा एकदा हा कॉमेडी शो मनोरंजनाचा ओव्हरडोस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com