esakal | Krishna Shroff च्या टॉपलेस फोटोशूटनं चाहते 'क्लिन बोल्ड'
sakal

बोलून बातमी शोधा

krishna shroff

Krishna Shroff च्या टॉपलेस फोटोशूटनं चाहते 'क्लिन बोल्ड'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

कृष्णाचा (krishna shroff) सध्या सोशल मीडियावरील (social media) नवीन अवतार पाहून फॅन्स खुश झाले आहेत. कृष्णानं यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे बोल्ड फोटोशुट (bold photoshoot) केले आहे. यावेळचा तिचा अंदाज जरा वेगळाच आहे. कृष्णा मोठी सेलिब्रेटी आहे. तिची वेगळी ओळख सांगायची झाल्यास ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण आहे. ती आपल्या बोल्ड अवतारासाठी नेहमीच चर्चेत असते. फिटनेस फ्रिक म्हणूनही ती सर्वांना परिचित आहे. (krishna shroff topless bold photo viral on instagram yst88)

कृष्णा ही फिटनेस फ्रीक आहे. त्यासंबंधीचे व्हिडिओ ती नेहमीच इंस्टाग्रामवर शेयर करते. कृष्णा ही एमएमए मॅट्रिक्स फिटनेस सेंटर आणि मॅट्रिक्स फाईट नाईटची संस्थापक आहे. ती फिटनेसच्या बाबतीत आपला भाऊ टायगर श्रॉफला देखील टक्कर देत असते. कृष्णाचा टॉपलेस फोटो आता एका मॅग्झिनच्या कव्हर पेजवर व्हायरल झाला आहे.. त्यामध्ये ती भलत्याच हॉट अवतारात दिसत आहे. दुसरीकडे तिला काहींनी ट्रोलही केले आहे.

हेही वाचा: जवळचे पैसे संपले, अभिनेत्री सविता बजाज आयसीयुमध्ये

हेही वाचा: #MeToo: वडिल अनुराग कश्यप यांच्यावरील आरोपावर आलियाची प्रतिक्रिया

कृष्णाचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच भावतो. तिनं यापूर्वी देखील अशाप्रकारचे बोल्ड फोटोशुट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करत असते. आपल्या फिटनेससाठीदेखील ती कमालीची लोकप्रिय आहे. त्याचे व्हिडिओ चाहत्यांच्या विशेष आवडीचे आहेत. कृष्णाचे बिकीनी फोटो चाहत्यांच्या आवडीचा विषय आहेत.

loading image