क्रिती खरबंदा देओल कॅम्पमध्ये

टीम ई सकाळ
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

गेस्ट इन लंडन, शादी मे जरूर आना या चित्रपटांमध्ये झळकलेली क्रिती खरबंदा आता देओल कॅम्पमध्ये दिसणार आहे. आगामी यमला पगला दिवानाच्या तिसऱ्या भागात ती दिसणार आहे. 

मुंबई : गेस्ट इन लंडन, शादी मे जरूर आना या चित्रपटांमध्ये झळकलेली क्रिती खरबंदा आता देओल कॅम्पमध्ये दिसणार आहे. आगामी यमला पगला दिवानाच्या तिसऱ्या भागात ती दिसणार आहे. 

या चित्रपटाचे नाव यमला पगला दिवाना फिर से असे असून नवनीत सिंग हा दिग्दर्शक या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी इंडस्ट्रीत पाय रोवणार आहे. रीतसर आॅडिशन देऊन तिची निवड करण्यात आली. क्रितीची निवड निश्चित झाल्यानंतर या चित्रपटात तिच्यासाठी एक खास पार्टी साॅंग चित्रित केले जाणार आहे. 

Web Title: Kriti kharbanda in a yamala pagala deewana fir se esakal news