''तुझ्याशी लग्न कोण करणार?'' क्रिती सॅननला विचारला होता प्रश्न Kriti Sanon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kriti Sanon

''तुझ्याशी लग्न कोण करणार?'' क्रिती सॅननला विचारला होता प्रश्न

बॉलीवूड म्हणजे झगमगती दुनिया, पण फसवं जग. इथं आली तर लाट नाहीतर भय्याची खाट असा प्रकार. भल्याभल्यानं या वाटेला जाऊ नये. ही आणि अशी अनेक वाक्य बॉलीवूड बद्दल ऐकायला मिळतात. सर्वसामान्य घरातल्या मुला-मुलीनं इथे जाण्याचं स्वप्न दूरदूर पर्यंत बघूच नये असंही म्हटलं जातं. इथं गॉडफादर लागतो अन्यथा स्ट्रगल करीत करीत म्हातारपण येतं अशा अनेक खनकथा बॉलीवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ऐकवल्या जातात. थोडक्यात मायेपोटी किंवा आणखी कशाखातर घाबरवलंच जातं म्हणूया नं. पण बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननला(Kriti Sanon) मात्र बॉलीवूडमध्ये येण्याआधी एक वेगळंच कारण सांगून घाबरवण्यात आलं होतं. सविस्तर वाचा.

हेही वाचा: राज कुंद्राचा पूर्व बिझनेस पार्टनर अभिनेता सचिन जोशी ईडीच्या रडारवर

क्रिती एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. अभ्यासात हुशार,इंजिनिअरिंगची स्टुंडट असं सगळं काही उत्तम सुरू असताना तिनं अचानक बॉलीवूडमध्ये करिअर करायचं ठरवल्यावर तिच्या घरच्यांसाठी,मित्रमैत्रिणींसाठी,नातेवाईकांसाठी तो एक धक्का होता. पण इथे तिच्या घरच्यांनी तिला तिच्या निर्णयात साथ द्यायचं ठरवलं पण ज्यांची साथ न मागताच नेहमी मिळते अशा मित्र-मैत्रिणींनी मात्र तिला बॉलीवूडच्या विचारापासनं परावृत्त करण्यासाठी मनधरणी करायला सुरुवात केली. तिच्या अतिशय जवळच्या मित्रानं तर पहिला प्रश्न केला की,'तू जर बॉलीवूडमध्ये गेलीस तर तुझ्याशी कोण चांगला मुलगा लग्न करणार?' हे ऐकून क्रितीला मात्र धक्का बसला होता. बरं इथेच सगळे थांबतील तर ते लोक कुठले, नातेवाईकांनी तर लग्नावरून तिला इतकं काही बाही बोलले की तिनं शेवटी थेट सांगितलं की, ''माझ्या आयुष्यात मी लग्नाला महत्त्व देत नाही. झालं तरी ठीक आणि नाही झालं तरी ठीक''. आणि अशा प्रकारे तिनं सगळ्यांच्या प्रश्नानांना एकाच उत्तरानं गप्प करून टाकलं.

हेही वाचा: शाहरुखनं कार्तिकला मन्नतबाहेर का ताटकळत उभं ठेवलं?

आज क्रितीनं चांगल्याप्रकारे बॉलीवूडमध्ये कुठलंही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. क्रितीनं आतापर्यंत 'दिलवाले','राबता','लुपाछूपी','हिरोपंती','पानिपत' अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. आगामी 'शहजादा' या सिनेमातही ती कार्तिक आर्यनसोबत आपल्याला दिसेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top