Adipurush:शूटिंगच्या शेवटच्या दिवशी खूप रडली कृति सनन,सीतेविषयी जे बोलली त्याची होतेय चर्चा Kriti Sanon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kriti Sanon share experience of Adipurush movie and her seeta role

Adipurush:शूटिंगच्या शेवटच्या दिवशी खूप रडली कृति सनन,सीतेविषयी जे बोलली त्याची होतेय चर्चा

Adipurush: प्रभास,कृति सनन,सैफ अली खान,सनी सिंग अभिनित 'आदिपुरुष' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. सिनेमाच्या टीझर रिलीजनंतर सोशल मीडियावर भलताच ट्रेंडिगला आहे हा सिनेमा. लोक सिनेमाच्या VFXची खिल्ली उडवत आहेतच शिवाय सिनेमातील राम,रावण,हनुमान यांच्या लूक्सवर भलतेच भडकले आहेत. म्हणजे हे तर स्पष्ट होत आहे की सिनेमाकडून लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्यांच्यावर टीझर रिलीजनंतर तरी पाणी पडलं आहे. अर्थात,आता दिग्दर्शक ओम राऊतनं समोर येऊन सिनेमा थिएटरमध्ये पाहिल्यावरच अंदाज येईल,आता छोट्या स्क्रीनवर तो तसाच दिसणार असं स्पष्ट केलं असलं तरी वाद सुरुच आहे.(Kriti Sanon share experience of Adipurush movie and her seeta role)

हेही वाचा: Viral Video: वडीलांचा अपमान सहन नाही झाला अभिषेक बच्चनला, शो मधनं तडक उठून निघून गेला...

आता यादरम्यानं कृतीनं सिनेमाच्या शूटिंगचे काही अविस्मरणीय अनुभव शेअर केले आहेत,ज्यांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. तिनं सांगितलं की शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ती खूपच भावूक झाली होती. चला जाणून घेऊया सीतेच्या व्यक्तिरेखेविषयी काय म्हणाली आहे कृति सनन.

कृति सनन आदिपुरुष सिनेमाविषयी बोलताना म्हणाली आहे की,''शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी खूपच भावूक झाले होते. मी स्वतःला खूप भाग्यशाली मानते की मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला इतकी चांगली भूमिका करायला मिळाली, आदिपुरुषच्या शूटिंगचा अनुभवही माझ्यासाठी खूप स्मरणीय राहील. शूटिंग संपूच नये असं मला वाटत होतं. आणि म्हणूनच माझे अश्रू मी आवरू शकले नाही''.

हेही वाचा: Sajid Khan: 'त्यानं अंगावरचा टॉप अन् ब्रा...', साजिद खान विरोधात जियाच्या बहिणीचा गौप्यस्फोट

आदिपुरुषमध्ये सीतेची व्यक्तिरेखा साकारणारी कृती सनन पुढे म्हणाली,''हा सिनेमा तिच्या खूप जवळचा आहे. जानकी ही व्यक्तिरेखा साकारणं खूप भाग्याचं आहे''.

आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला आहे आणि लवकरच याचा ट्रेलरही रिलीज केला जाईल. सिनेमातील कलाकारही आता प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा १२ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

हेही वाचा: Adipurush: सैफला पाहून भडकला महाभारतातील दुर्योधन; पुन्नीत इस्सर म्हणाले,'हा तर...'

कृती सननजवळ सध्या भरपूर सिनेमे आहेत. ती वरुण धवनच्या भेडिया मध्ये देखील दिसणार आहे. भेडियाचा टीझर नुकताच रीलिज झाला आहे. त्याव्यतिरिक्त तिच्याकडे गणपत सिनेमा आहे,ज्यात ती जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसंच,कार्तिक आर्यन सोबत ती शहजादा सिनेमातही काम करतेय.