क्रिती सेनॉनची बहिणही बॅालिवुडमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची बहीण नूपुर अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावू पाहत आहे.

नवी दिल्ली : आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची बहीण नूपुर अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावू पाहत आहे. नूपुर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते. आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

नूपुरला तिच्या अभिनयाच्या सुरुवातीलाच अक्षयकुमारबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. नूपुर आणि अक्षय ‘फिलाल’ या म्युझिक व्हिडीओसाठी एकत्र आले आहेत. नूपुर म्हणते, ‘माझ्या अभिनयाची सुरुवातच अक्षयकुमारपासून झाली आहे. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मी अस्वस्थ झाले होते. पण अक्षय सरांनी मला पूर्णपणे सांभाळून घेतलं.’  
web title : Kriti Senon's sister is also in Bollywood


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kriti Senon's sister is also in Bollywood