KRK Arrest: बॉलीवूडविरोधात 'टिवटिव' करणारा 'केआरके' किती कोटींचा मालक?|KRK aka Kamaal R Khan Net Worth viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK And Hrithik Roshan

KRK Arrest: बॉलीवूडविरोधात 'टिवटिव' करणारा 'केआरके' किती कोटींचा मालक?

KRK aka Kamaal R. Khan Net Worth : बॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावर सारखी टिवटिव करणारा कमाल राशिद खान अर्थात केआकेच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून आज त्याला बोरिवली (social media viral news) कोर्टात हजर केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून केआरके हा चर्चेत होता. त्यानं बॉलीवूडच्या सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान, काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर (bollywood actor) केआरकेनं निशाणा साधला होता. सलमान खानच्या राधेवर त्यानं केलेला रिव्ह्यु तर अनेकांना खटकला होता. त्यामुळेच की काय सलमाननं त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता.

केआरके स्वताचे युट्य़ुब चालवतो. त्याला बऱ्यापैकी प्रेक्षकवर्गही आहे. मात्र आपल्या आक्रमक स्वभावाचा फटका कमाल खानला अनेकदा बसला आहे. त्याची परिक्षण करण्याची पद्धत ही वैयक्तिक पातळीवरील आरोपामुळे चर्चेत आल्यानं तो अनेकांच्या रोषाचे कारण ठरला आहे. आमिरच्या लाल सिंग चढ्ढाचा त्यानं केलेला रिव्ह्यु देखील नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यामध्ये त्यानं ज्या प्रकारे रिव्ह्यु केला त्यात आमिरविषयी त्याचा द्वेष दिसून आला होता. आपल्याला कोणत्या खान मंडळीकडून सर्टिफिकेटची गरज नसल्याचे त्यानं यापूर्वी सांगितलं आहे. संपत्तीच्या बाबत सेलिब्रेटींना टक्कर देणारा कमाल खान मोठं व्यक्तिमत्व गेल्या काही दिवसांत झालं आहे.

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशी भूमिका या कमाल खाननं पार पाडली आहे. त्यानं देशद्रोही नावाच्या चित्रपटापासून सुरुवात केली होती. त्या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. त्यात त्यानं केलेला अभिनय जरी सुमार असला तरी त्या चित्रपटाचा विषय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा होता. कमाल खान हा कोट्यवधींचा मालक आहे. त्याच्याकडे अलिशान बंगला, महागड्या गाडया आहेत. एका वेबपोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे 40 कोटींची संपत्ती आहे. एका वर्षाला तो एक ते दोन कोटींची कमाई करतो असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: KRK Arrest: अभिनेता केआरकेला अटक! वादग्रस्त ट्विट भोवलं...

पेड प्रमोशन, व्हायरल व्हिडिओ, सोशल मीडियावरील जाहिराती आणि मुलाखती यांच्या माध्यमातून केआरकेनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या युट्युबला देखील नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. एवढचं नाहीतर त्याचा दुबईमध्ये जन्नत नावाचा बंगला आहे. त्यानं मुंबईमध्ये 21 हजार स्क्वेअर फुटचा फ्लॅट खरेदी केला आहे.

हेही वाचा: Sidhu Mooswala Murder case: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाचा जेरबंद! अझरबैझानमधून अटक

Web Title: Krk Aka Kamaal R Khan Bollywood Actor Arrest Net Worth Viral Income Source

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..