KRK Arrest: अभिनेता केआरकेला अटक! वादग्रस्त ट्विट भोवलं...

बॉलीवूडचा अभिनेता केआरकेला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
 KRK Arrest
KRK Arrestesakal

KRK Arrest: बॉलीवूडचा अभिनेता केआरकेला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपल्या परखड आणि सडेतोड प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा कमाल राशिद खान अर्थात केआरकेच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी चर्चा सुरु होती. तो जेव्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. आज त्याला बोरिवली कोर्टात हजर केले जाणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. केआरके हा सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या राधे चित्रपटावर त्यानं केलेला रिव्ह्यु सलमानला चांगलाच झोंबला होता. त्यानंतर त्यानं कमालच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सलमानकडून करण्यात आली होती. सलमानच्या आक्रमकतेपुढे कमाल खाननं नमतं घेतलं होतं.

 KRK Arrest
Chris Rock: 'ऑस्करमध्ये ॲकरिंग नको रे बाबा!' ख्रिस रॉकचा नकार

कमालनं आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाचा जो रिव्ह्यु केला त्याला देखील त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र त्यावरुन अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी नाराजी व्यक्त केली होती. कमाल नेहमीच बॉलीवूडमधील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल परखडपणे वक्तव्य करत असतो. बॉलीवू़मधील नेपोटिझमविषयी त्यानं केलेलं वक्तव्य बराच काळ चर्चेत होतं. आता त्याला अटक झाल्यानंतर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 KRK Arrest
Ram Setu Controversy: 'रामसेतू'चा वाद पेटला! काय आहे कारण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com