KRK : विक्रम वेधानंतर कोणत्याही चित्रपटाचे समीक्षण करणार नाही; नेटकरी म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK Latest News

KRK : विक्रम वेधानंतर कोणत्याही चित्रपटाचे समीक्षण करणार नाही; नेटकरी म्हणाले...

KRK Latest News चित्रपट समीक्षक आणि अभिनेता केआरके अनेकदा ट्विटमुळे चर्चेत असतो. केआरकेचे (KRK) ट्विट आणि रिव्ह्यू सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. अशा परिस्थितीत केआरकेने ट्विट केले आहे. ज्यामुळे त्याचे चाहते दु:खी झाले आहेत. सैफ अली खान, हृतिक रोशन आणि राधिका आपटे स्टारर विक्रम वेधा या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटाचे समीक्षण करणार नसल्याचे केआरकेने म्हटले आहे.

केआरकेने ट्विटमध्ये लिहिले की, मी सोडले. विक्रम वेधा हा शेवटचा चित्रपट असेल ज्याचे मी समीक्षण करणार आहे. माझ्या समीक्षणावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वांत मोठा समीक्षक बनवल्याबद्दल सर्वांचे आभार. मला समीक्षक म्हणून न स्वीकारल्याबद्दल आणि माझे समीक्षण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याबद्दल बॉलिवूडमधील लोकांचे आभार...

एकीकडे केआरकेच्या (KRK) या निर्णयावर काही सोशल मीडिया युजर्स खूप खूश आहेत, तर दुसरीकडे अनेक चाहते या निर्णयामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा केआरकेचा टीआरपी स्टंट आहे. तो विक्रम वेधानंतरही रिव्ह्यू देत राहील, असे अनेक युजर्स म्हणत आहेत. केआरकेच्या या ट्विटमुळे अनेक चाहते दु:खी झाले आहेत.

विक्रम वेधावर यापूर्वीही ट्विट

यापूर्वी देखील केआरकेने विक्रम वेधा या चित्रपटाबद्दल ट्विट केले होते. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते की, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी बॉलिवूडच्या लोकांनी मला पुन्हा तुरुंगात टाकले नाही, तर मी विक्रम वेधाचे नक्कीच समीक्षण करेन. केआरकेचे हे ट्विट वेगाने व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वी अटक

काही दिवसांपूर्वी केआरकेला तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मिळाला होता. २०२० मध्ये केआरकेने ऋषी कपूर, इरफान खान आणि अक्षय कुमार यांच्यावर एक वादग्रस्त ट्विट केले होते. या प्रकरणी त्याला विमानतळावरूनच अटक करण्यात आली होती. याशिवाय 2019 मध्ये एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती. केआरकेच्या फिटनेस ट्रेनरने विनयभंगाचा आरोप केला होता. सध्या त्याला दोन्ही प्रकरणात जामीन मिळाला आहे.

टॅग्स :movie reviewKRK