KRK Tweet: अक्षय, करण की शाहरुख? कुणी काढला केआरकेचा काटा?

केआरकेनं बॉलीवूडपटांचे जे रिव्ह्यु केले त्यावरुन निर्माते आणि सेलिब्रेटी नाराज झाल्याचे दिसून आले आहे.
KRK After Bail
KRK After Bailesakal

KRK Tweet Viral News: आपल्या वाचाळपणामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या केआरकेला जेलची हवा खावी लागली आहे. तो बऱ्याचदा बॉलीवूडच्या सेलिब्रेटींवर त्यांच्या चित्रपटांवर बोलत असतो. त्यानं काही आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामुळे तो दोन आठवड्यांहून अधिक काळ जेलमध्ये होता. आता (Bollywod News) त्याची जामीनावर सुटका झाली असून त्यानं आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी कोणी महत्वाची भूमिका घेतली याविषयी खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून केआरके हा त्याच्या बोलण्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचा त्याला फटकाही बसला आहे.

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष सध्या सुरु आहे. यासगळ्यात केआरकेनं बॉलीवूडपटांचे जे रिव्ह्यु केले त्यावरुन निर्माते आणि सेलिब्रेटी नाराज झाल्याचे दिसून आले आहे. त्यान सुरुवातीला बॉलीवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतला होता. सलमानच्या राधे नावाच्या चित्रपटावर त्यानं केलेलं परिक्षण हे सलमानला अजिबात आवडलं नव्हतं. त्यातून सलमाननं आपली बदनामी केल्याचा आरोप केआरकेवर केला होता. यावेळी केआरकेला कोर्टानं समजही दिली होती. पण ऐकेल तो केआरके कसला...

त्यानंतर आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढावर केआरकेनं केलेला रिह्यु हा चर्चेत आला होता. याशिवाय बॉलीवूडमधील करण जोहर, अर्जुन कपूर, अक्षय कुमार यांच्यावर सतत टिप्पणी करणाऱ्या केआरकेच्या विरोधात बॉलीवूड सेलिब्रेटी एकवटल्याचे दिसून आले होते. यासगळ्यात आता केआरकेनं आपल्याला जेलमध्ये कुणी पाठवले याविषयी खुलासा केला आहे.

KRK After Bail
Ayushman Khurana: ट्रेनमध्ये गाणी गाणारा आता बॉलीवूडचा 'आयुषमान'

केआरकेचं म्हणणं आहे की, मला शाहरुख, अक्षय यांच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं आहे. मी जे खरं बोललो ते त्यांना न आवडल्यानं त्यांनी माझ्यावर जे नाही ते आरोप करुन जेलमध्ये पाठवलं. असा सणसणीत आरोप केआरकेनं आता त्यांच्यावर केला आहे.

KRK After Bail
'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com