
KRK Wants To Join RSS News मागील काही दिवसांपासून कमाल आर खान उपाख्य केआरके चांगलाच चर्चेत आहे. केआरके (KRK) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ट्विटरवर (Tweet) सक्रिय पाहायला मिळत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याने राजकारणात येण्याचा विचार करीत असल्याचे ट्विट केले होते. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल काहीही बोलला नव्हता. आता त्याने नवीन ट्विट करून स्पष्ट केले आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरके (KRK) ट्विट करताना दिसत आहे. प्रथम त्याने सूड घेण्यासाठी आल्याचे सांगितले होते. नंतर ट्विट करीत तुरुंगात १० किलो वजन कमी झाल्याचे सांगितले. यानंतर ‘लवकरच राजकारणात (Politics) प्रवेश करणार’ असे ट्विट केआरकेने केले होते. केआरके ट्विटमुळे नेहमी चर्चेत असतो.
आता केआरकेने राजकारणातील प्रवेशावर ट्विट केले आहे. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ट्विट टॅग करून विनंती केली आहे. ‘संघाला गरज असेल तर मी आरएसएसमध्ये यायला तयार आहे’ असे केआरकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावर ट्रोल
केआरकेच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर आरएसएस जॉइन करता येत नाही. नागपुरात जावे लागेल असे म्हणत युजर्सनी ट्विटची खिल्ली उडावली आहे. केआरके नेहमीच ट्विटमुळे ट्रोल होतो किंवा चर्चेत राहतो.
काय म्हणाला होता केआरके
मी लवकरच एका राजकीय पक्षात सामील होणार आहे. कारण, देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नाही तर नेता असणे गरजेचे आहे, असे ट्विट करताना केआरकेने लिहिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.