'अशावेळी बाहेरची दाल मखनी कोण खाईल का'?

 krushna abhishek comment about his wife kashmira shah
krushna abhishek comment about his wife kashmira shah

मुंबई - सोशल मीडियावर मिळणा-या प्रसिध्दीच्या हव्यासापोटी काहीही पोस्ट शेयर करतात. कोण वादग्रस्त वक्तव्ये करुन लक्ष वेधून घेतो. तर कुणी फोटो टाकून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. अभिनेता कृष्णा अभिषेकने आपली पत्नी कश्मिरा शहा हीचा एक फोटो शेयर केला असून त्याबद्दल त्याने दिलेल्या कमेंटवरुन तो ट्रोल होऊ लागला आहे. अनेकांनी त्याच्या कमेंटवर मिश्किल टिप्पणी केली आहे.

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१३ मध्ये लास वेगासमध्ये दोघांनी गपचुप लग्न केलं होतं.  कृष्णाने त्याच्या पत्नीचा एक हॉट अंदाजातील फोटो शेयर केला आहे. त्याला त्यानेच गंमतीशीर कमेंट दिली आहे. आपल्या पत्नीने केलेली वेशभुषा कमालीची सुंदर दिसत आहे. आपली बायको एवढी सुंदर दिसत असताना आपण दुस-या स्त्रीकडे कसे पाहु अशा असा अर्थ सुचित करणारी ती पोस्ट आहे.

कश्मीराने ब्लॅक लो कट मोनॉकिनीवर नुकतंच फोटोशूट केलं. त्या फोटोशूटमधील एक फोटो कृष्णाने त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला. कश्मीराच्या बोल्ड फोटोच्या कॅप्शनमध्ये कृष्णाने लिहिलं, ‘जेव्हा तुमच्या घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी का हवी असेल? तू तुझ्या ‘हॉट’ अंदाजात पुन्हा आली आहे. कश्मीरा तुझ्यावर मला खूप अभिमान आहे.’ असे त्याने म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कश्मीराने सांगितलं की,  कृष्णाला तिच्या बोल्ड फोटोशूटवर आक्षेप नसतो. “माझ्या हॉट आणि बोल्ड अंदाजावरच कृष्णा फिदा झाला होता आणि पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक आकर्षण हे खूप महत्त्वाचं असतं. मी त्याच्या विनोदबुद्धीकडे आकर्षित झाले होते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करण्यावर किंवा बोल्ड फोटोशूट करण्यावर त्याचा कधीच आक्षेप नसतो”, असं तिने सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com