Krishna Abhishek : कृष्णा अभिषेक झाला बिग बॉसचा हिस्सा!; अशी घेणार स्पर्धकांची क्लास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krushna abhishek Latest News

Krushna Abhishek : कृष्णा अभिषेक बिग बॉसचा हिस्सा!; अशी घेणार स्पर्धकांची क्लास

krushna abhishek Latest News आज रात्रीपासून बिग बॉस १६ (Bigg Boss) हा रिॲलिटी शो सुरू होणार आहे. शोमध्ये टीव्हीवरील अनेक नामांकित व्यक्ती सहभागी होणार आहेत. आता या शोमध्ये कॉमेडियन कृष्णा अभिषेकचेही (Krishna Abhishek) नाव जोडले गेले आहे. कृष्णा या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार नाही. परंतु, तो वेगळीच भूमिका साकारणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ सोडून कृष्णा आता बिग बॉससोबत धमाका करणार आहे.

बिग बॉसशी संबंधित वूट ॲप प्रेक्षकांचा सर्वांत लाडका होस्ट कृष्णा अभिषेक याच्यासोबत बिग बझ हा साप्ताहिक शो प्रसारित करण्यासाठी सज्ज आहे. शोमध्ये कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) बिग बॉसच्या स्पर्धकांसोबत गेम खेळणार आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर कृष्णा आणि त्याचे कुटुंबीय स्पर्धकांचा क्लास घेतील.

हेही वाचा: Hina Khan : हिना खान झाली जलपरी; स्वीमिंग पूलच्या आत फोटोशूट

हा नवा शो बिग बॉसच्या (Bigg Boss) क्रेझी चाहत्यांभोवती फिरतो. कृष्णा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांशी संवाद साधताना आणि त्यांच्यासोबत गेम खेळताना दिसणार आहे. यासोबतच तो स्पर्धकांविषयी प्रेक्षकांची मतेही घेणार आहे. अशाप्रकारे तो प्रेक्षकांसाठी काही अतिरिक्त मसाला घेऊन येणार आहे. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासोबतच कृष्णा अभिषेक शोदरम्यान त्याच्या मजेदार अवतारात दिसणार आहे.

बिग बझ लाँच झाल्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांना बिग बॉसच्या घरातील पडद्यामागील वेडेपणा आणि रोमांच जाणून घेता येईल. हा शो ९ ऑक्टोबरपासून रविवारी वूट ॲपवर दाखवला जाईल. बिग बॉस हा पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांचा सर्वांत आवडता रिॲलिटी शो आहे. मला आनंद आहे की बिग बझ होस्ट करण्याची संधी मिळाली आहे. येथे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांचा क्लास घेईन, असा कृष्णा अभिषेक म्हणाला.

हेही वाचा: Priya Prakash Varrier : प्रिया प्रकाशने परिधान केली बिकिनी; फोटो व्हायरल

घराच्या आत बिग बॉस स्पर्धकांचा क्लास घेईल आणि घराबाहेर मी घेईन. नवीन फॉर्मेटसह शोला नवीन स्तरावर नेईन. मला खात्री आहे की बिग बॉसचे स्पर्धक घरातील गोष्टी उघडपणे सांगतील आणि माझ्या उपस्थितीमुळे शोमध्ये काही अतिरिक्त मसाला आणि तडका येईल, असेही कृष्णा अभिषेक म्हणाला.