Priya Prakash Varrier : प्रिया प्रकाश वारियरने परिधान केली बिकिनी; आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priya Prakash Varrier Latest News

Priya Prakash Varrier : प्रिया प्रकाशने परिधान केली बिकिनी; फोटो व्हायरल

Priya Prakash Varrier Latest News विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियरचे (Priya Prakash Varrier) काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये प्रिया प्रकाश बिकिनी घालून पूलमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. २०१८ मध्ये प्रिया प्रकाश वारियर अचानक प्रसिद्ध झाली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये प्रिया प्रकाश डोळे मिचकावताना आणि सुंदर हावभाव करताना दिसत होती.

यानंतर प्रिया प्रकाश वारियरला अनेक चित्रपटांची ऑफर आली होती. परंतु, तिने फक्त तिच्याकडे असलेल्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) केवळ वर्कफ्रंटवरच सक्रिय नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रिया दररोज लेटेस्ट फोटो शेअर करीत असते.

हेही वाचा: Hina Khan : हिना खान झाली जलपरी; स्वीमिंग पूलच्या आत फोटोशूट

प्रिया प्रकाश वारियरने सोशल मीडियावर (social media) स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये प्रिया पूलमध्ये मस्त स्टाईलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. प्रिया प्रकाशने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. मागे आकाश आणि उंच इमारती दिसत आहेत.

फोटो शेअर करताना प्रिया प्रकाशने कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही. फक्त बटरफ्लाय इमोजी टाकली आहे. फोटो शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक प्रिया प्रकाशच्या स्टाइलचे कौतुक करताना दिसत आहेत.