अभिनेता कुशल बद्रिकेचं 'हे' भारुड एकदा ऐकाच...कलेच्या माध्यमातून करतोय जनजागृती

kushal
kushal

मुंबई- कोरोना विषाणू देशभरात झपाट्याने हात पाय पसरत आहे. या विषाणूपासून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवता येईल याकडे सारेचजण आवर्जुन लक्ष देत आहेत. तसेच कलाविश्वातील मंडळी या कठीण परिस्थितीत गरजूंना मदत करण्यास पुढे सरसावली आहेत. सोशल मीडिद्वारेही कलाकार कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेही त्यातीलच एक कलाकार आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्याने लोककलेचा उपयोग केला आहे. 

आपली पत्नी, मुलगा यांसह त्याने 'कोरोना होईल गं...' हे भारुड तयार केलं आहे. आणि या भारुडाचा व्हिडिओ त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम कुशलने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीने कोरोनावर भारुड तयार केले आहे. 'लोक आपापल्या कलेने वागायला लागले की मग लोककलेतुन त्यांना शहाणपण सांगावं' असे कॅप्शन त्याने हा व्हडिओ शेअर करताना दिले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@sunayana_badrike_kathak @jogpushkar @vijumaneofficial @zeemarathiofficial #कforcreative

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

मास्क, सॅनिटायझर नियमीत वापरा, कोरोनाला हरविण्यासाठी जिथे आहात तिथेच थांबा, घरातच राहा अशा प्रकारचा संदेश त्याने मनोरंनाद्वारे जनतेला दिला आहे. धुरळा या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर हिने बुरगुंडा ही व्यक्तिरेखा साकारली होती..या सिनेमात शिक्षण घेण्यावरुन तिने हे भारुड गायलं होतं...याचाच उपयोग कुशलने त्याच्या या भारुडामध्ये केला आहे..

याआधी कुशलने 'गो कोरोनीया गो' हे गाणं तयार केलं होतं. त्याचं हे गाणंही सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. या गाण्यामधूनही त्याने कोरोना विषाणू रोखायचा असेल तर काय काय काळजी घ्यावी?  हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच्या या नव्या भारुडालाही नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

कुशल आणि त्याचे कुटुंबही जनजागृतीसाठी करत असलेला कलेचा वापर खरंच कौतुकास्पद आहे.

kushal badrike sings awareness song on corona virus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com