'क्योंकी सासं भी कभी बहू थी' मालिकेच्या आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 July 2019

रिश्तों के भी रुप बदले है, नऐ नऐ साचें में ढलते हैं, एक पिढी आती है, एक पिढी जाती है, बनती कहानी नई....क्योंकी सासं भी कभी बहू थी...साधरण 2000 साली दररोज टिव्हीवर ऐकू येणारी हे गीत पुन्हा सोशल मिडीयावर पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. निमित्त होते क्योंकी सासं भी कभी बहू थी च्या स्टारकास्टच्या रियुनियन पार्टीचे.

तब्बल 8 वर्ष सुरु असलेली टिव्हीच्या पदड्यावरील प्रेक्षकांच्या आवडीची मालिका संपून 19 वर्ष झाली. त्यानिमित्त या मालिकेतील कलाकरांनी रियुनियन पार्टी आयोजित केली होती. मालिकेत व्हँपची भूमिका साकरणारी पायल म्हणजेच अभिनेत्री जया भटाचार्य यांनी या रियुनियन पार्टीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी सर्व कलाकरांनी मिळून मालिकेचे शिर्षक गीतही गायले असून त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे

या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये कलाकार सुमीत सचदेवा, कोमलिका गुहा ठाकुरता, शक्ती सिंह, मुनि झा, हुसैन, संदीप बसवाना, ख्याती खांडके केसवानी, रितु चौधरी सेठ, जितेन ललवाणी आणि इतर कलाकार दिसत आहेत. जया यांनी हे फोटो शेअर करताना आम्ही 19 वर्ष अजुनही एकत्र आहोत असे पोस्टमध्ये लिहले आहे. तसेच स्मृती इराणी आणि अपरा मेहता यांची आठवण येत असल्याचे पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे. मालिकेतील तुलसीची भुमिका स्मृती इराणी यांनी साकारली होती तर सविताची भूमिका अपराने साकारली होती.

रितु , कोमलिका, ख्याती यांनीही इंस्टाग्रामवर या रियुनियन पार्टीचे काही फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेतील कलाकरांच्या रियुनयन पार्टीला सोशल मिडियावर नेटकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Crazies ❤️

A post shared by Khyaati Yash Keswani (@khyaatikeswaniofficial) on

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kyunki saas bhi kabhi bahu thi TV Serial actor reunited