
Laal Singh Chaddha News: आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढावरुन सध्या भारतात मोठा वाद सुरु आहे. आमिरच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी घेतलेल्या (Aamir Khan News) आक्रमकपणामुळे लाल सिंग चढ्ढाला आता आवराआवर करावी लागली आहे. आमिरच्या वाट्याला पहिल्यांदाच अशाप्रकारे नामुष्की ओढावल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर आणि त्याच्या (entertainment news) लाल सिंग चढ्ढानं बॉलीवूडचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला देखील त्याचा मोटा फटका बसला आहे. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले आहे. आमिरला आपल्याबाबत असं होईल असे वाटले नव्हते.
आले प्रेक्षकांच्या मनात तेव्हा त्यांचे काय सांगावे, ते जे म्हणतील तसं, त्यांनी जर ठरवले एखाद्याला स्टार करायचे तर ते करतात आणि स्टार असणाऱ्याला जमिनीवर आणण्याचे काम देखील ते करत असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्याचा प्रत्यय आमिर खाननं लाल सिंगच्या निमित्तानं घेतला आहे. त्याला लाल सिंग चढ्ढाच्या बाबत आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल असे वाटले नव्हते. भारतात हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे सांगण्यात येत असून परदेशात मात्र त्यानं मोठी कामगिरी केली आहे. परदेशातील बॉक्स ऑफिसचे आकडे समोर आले आहेत.
11 ऑगस्टला आमिरचा लाल सिंग चढ्ढा प्रदर्शित झाला होता. त्यात करिना कपूर, नागा चैतन्य, मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक म्हणून लाल सिंग चढ्ढाकडे पाहिले जाते. हॉलीवूडची कॉपी करणाऱ्या आमिरच्या या चित्रपटावर बहिष्काराची मागणी करण्यात आली. त्याचा फटका त्याला बसल्याचे दिसून आले आहे. आमिरनं परदेशात कमाई करण्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यात त्यानं द काश्मीर फाईल्स, गंगुबाई काठियावाडी, भुलभुलैय्या 2 यांना मागे सोडले आहे.
लाल सिंगनं परदेशात 7.5 मिलियन डॉलर एवढी कमाई केली आहे. त्याच्यापाठोपाठ गंगुबाई काठियावाड - 7.47, द काश्मीर फाईल्स 5.7 मिलियन यांचा क्रमांक आहे. ही आकडेवारी पाहता आमिरच्या लाल सिंगला भारतात काहीच प्रतिसाद मिळाला नसून परदेशात मात्र त्यानं नेत्रदीपक यश मिळवल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.