Koffee With Karan : 'आमिर एकमेव अभिनेता ज्यानं मला..! करिनाचं मोठं सिक्रेट'| Aamir Khan Kareena Koffee with Karan season 7 interview | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan news

Koffee With Karan : 'आमिर एकमेव अभिनेता ज्यानं मला..!' करिनाचं मोठं सिक्रेट

Koffee With Karan Season 7 Exclusive: बॉलीवूडची बेबो करिना ही सध्या लाल सिंग चढ्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. करिनानं वेगवेगळी वक्तव्यं करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकीकडे लाल सिंग चढ्ढावर टीका होत (Bollywood news) असताना दुसरीकडे करिनानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. करिना आणि आमिर हे कॉफी विथ करण 7 मध्ये सहभागी झाले होते. (Bollywood Actor) यावेळी त्यांनी करणच्या इरसाल प्रश्नांना तितक्याच (Aamir Khan And Kareena Kapoor Khan) दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. करिनानं तर आपल्या बॉलीवूडमधील करिअरमधलं सगळ्यात मोठं सिक्रेट सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे. (Aamir Khan and Kareena Kapoor Khan).

कॉफी विथ करणचा तो एपिसोड चांगलाच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे. आमिर आणि करिनानं यात लाल सिंग चढ्ढाच्या निमित्तानं अनेक मोठे खुलासे केले आहेत. वास्तविक करणच्या या शो चा एक इपिसोड प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चाहत्यांना दुसऱ्या भागाचे वेध लागले आहेत. त्याच्या टीझरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. यासगळ्यात उत्सुकता आहे ती करिनाच्या वक्तव्याची. तिनं आपलं एक सिक्रेट यावेळी शेयर केलं आहे. यापूर्वी आपल्याला असा अनुभव कधी आला नाही. मात्र आमीरचा चित्रपट होता म्हणून तो येणं स्वाभाविक होतं. असं करिना म्हटली आहे.

करणनं करिनाला विचारलं की, तू शेवटच्या कोणत्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. आणि तो कोणता दिग्दर्शक होता ज्यानं ही ऑडिशन घेतली होती. त्यावेळी करिनानं सांगितलं की, लाल सिंग चढ्ढाच्यावेळी मला हा अनुभव आला. आणि हे असं पहिल्यांदाच झालं होतं. कदाचित शेवटचं सुद्धा. कारण मी कधीही अशाप्रकारे स्क्रीनटेस्ट दिली नव्हती.

हेही वाचा: Kareena Kapoor: 'प्रेग्नंसीच्या' बातमीवर करिनाचं मोठं वक्तव्य

यासगळ्यावर आमीरनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, सैफ म्हणाला होता, केवळ आमीर खान हा एकमेव अभिनेता आहे जो करिनाला कास्ट करताना तिची स्क्रिन टेस्ट घेईल. पण मला याचा आनंद आहे की करिनानं त्याला संमती दिली. चित्रपटासाठी अशी गोष्ट करावी लागते. चित्रपटाचा भाग होण्यासाठी आपली भूमिका समजून घेण्यासाठी हे सगळं गरजेचं असतं असं आमीरनं म्हटलं आहे. मी त्या भूमिकेत करिना शिवाय आणखी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीची कल्पनाही करु शकत नव्हतो.

हेही वाचा: Bollywood: ‘राम सेतू’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; सुब्रमण्यम स्वामींची कोर्टात धाव

Web Title: Laal Singh Chaddha Movie Aamir Khan Kareena Koffee With Karan Season 7 Interview Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..