Bollywood: ‘राम सेतू’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; सुब्रमण्यम स्वामींची कोर्टात धाव

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा अक्षय कुमारवर निशाणा
Ram setu
Ram setu esakal

अक्षय कुमार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. बॉलीवूडचा ‘राम सेतू’ या चित्रपटाबाबत हा वाद निर्माण झाला आहे. अक्षयच्या राम सेतू या चित्रपटात चुकीचे सत्य दाखवले जात असल्याचा आरोप करत भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी शनिवारी दोन ट्विटही केले. या ट्विटमध्ये स्वामींनी अभिनेत्याच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले की, जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर तो त्याला देशातून हाकलण्यासही सांगू शकतो.

यासोबतच अभिनेत्यासह चित्रपट निर्मात्यांवरही कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या ट्विटमध्ये स्वामींनी म्हटले आहे की, मी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा प्रो़डक्शन वर गुन्हा दाखल करणार आहे. त्याने त्याचा आगामी चित्रपट राम सेतू चुकीच्या पद्धतीने मांडला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे राम सेतूची प्रतिमा खराब झाल्याचे स्वामींनी लिहिले आहे.

यानंतर त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये चित्रपट अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरही प्रश्न उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी असेही लिहिले आहे की, जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करण्याची तसेच देशाबाहेर काढण्याची मागणी करू. विशेष म्हणजे अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर अनेकदा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जातात. अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

राम सेतू हा चित्रपट भारत आणि श्रीलंका दरम्यान बांधलेल्या राम सेतूवर आधारित आहे. यामध्ये अक्षय कुमारने एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, जो त्याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त नुसरत भरूच आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com