Boycott LSC: 'शेवटी आपण...', हात जोडून आमिरनं दुसऱ्यांदा मागितली माफी!|Laal Singh Chddha Aamir khan apologizes tweet viral social | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boycott LSC news

Boycott LSC: 'शेवटी आपण...', हात जोडून आमिरनं पुन्हा मागितली माफी!

Boycott Bollywood Movies: लाल सिंग चढ्ढाला प्रेक्षकांनी बॉयकॉट करण्याचा निर्णय घेणं हे काही आमिरच्या पचनी पडलं नाही. त्यानं कधी स्वप्नातही असा (Laal Singh Chaddha Movies) विचार केला नसेल की आपल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येतील. लाल सिंग हा प्रदर्शित होण्यापासून (Aamir Khan Apologies) दोन आठवडे चर्चेत होता. त्याच्याविरोधात बहिष्काराची मोहिम जोरदापणे राबवण्यात आली होती. केवळ आमिरच नाही तर अक्षय कुमारच्या रक्षाबंधन नावाच्या चित्रपटाला देखील त्याचा सामना करावा लागला होता. मात्र त्याची सर्वाधिक झळ बसली ते आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला. त्याचे दीडशे कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या चित्रपटानं निराशा केली आहे.

आमिरनं त्याच्या एका पत्रकार परिषदेमध्ये प्रेक्षकांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यात तो म्हणला होता. ज्या वक्तव्यामुळे मला ट्रोल केले जात ते वक्तव्य मी नव्हे तर माझ्या पत्नीनं केलं होतं. त्याला वेगळा संदर्भ होता. आता तो वेगळ्या पद्धतीनं समोर येताना दिसतो आहे. त्याचा परिणाम माझ्या चित्रपटांवर होतो आहे. मी चाहत्यांची माफी मागतो. जर माझ्या बोलण्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील किंवा ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्या सर्वांची मी माफी मागतो. मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. त्यानंतर आता पुन्हा आमिरनं ट्विटरवरुन व्हिडिओ शेयर केला आहे.

Aamir Khan news

Aamir Khan news

आमिरच्या पाठीशी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उभे राहिले आहेत. त्यांनी त्याचे कौतूक करत ट्रोलर्सला झापल्याचे दिसून आले आहे. आमिरला ट्रोल करणे म्हणजे आपण त्याच्यावर मोठा अन्याय करत असल्याचे निर्माती एकता कपूरनं म्हटले होते. अर्जुन कपूरनं तर ट्रोलर्सला थेट धमकीच दिली होती. खबरदार यापुढे आम्हाला ट्रोल केलं तर अशा शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता आमिरनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओतून नेटकऱ्यांची माफी मागत ज्या कुणाला वाईट वाटले असेल त्यांची मी माफी मागतो असे म्हटले आहे. त्याच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: ऋषीपंचमीचा खगोलशास्त्राशी काय आहे संबंध?

Aamir Khan news

Aamir Khan news

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

अकरा ऑगस्टला आमिरचा लाल सिंग प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. आमिरनं त्याच्या दुसऱ्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, शेवटी आपण सगळेच माणसे आहोत. चुका तर सगळ्यांकडूनच होतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी मला माफ करावे अशी विनंती आमिरनं केली आहे. आजपासून मिच्छामी दुक्कडम् अर्थात क्षमा मागण्याचे पर्व सुरु होत आहे. त्यानिमित्तानं आमीरनं ती पोस्ट केली आहे. आमिरनं दुसऱ्यांदा नेटकऱ्यांची माफी मागितल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

Web Title: Laal Singh Chddha Aamir Khan Apologizes Tweet Viral Social Media Boycott Bollywood Forever

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..