Lal Salaam Trailer : धर्म,सत्ता,राजकारण अन् 'मोईद्दीन भाई'! 'लाल सलाम'च्या ट्रेलरमध्ये 'कपिल देव' ची एंट्री

Kapil Dev's entry in the trailer of 'Lal Salaam' : रजनीकांत यांच्या लाल सलामचा (Lal Salaam Trailer Rajinikanth) ट्रेलर आता समोर आला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.
Lal Salaam Rajinikanth as Moideen Bhai
Lal Salaam Rajinikanth as Moideen Bhaiesakal

Lal Salaam Rajinikanth as Moideen Bhai : साऊथचा थलायवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या रजनीकांत यांच्या लाल सलाम नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आता समोर आला आहे. त्यामध्ये रजनीकांत यांचा वेगळा स्वॅग दिसून येतो आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठी चर्चा होती. आता त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सध्या तमिळ भाषेत या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. धर्म, राजकारण आणि सत्ता याविषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत विक्रांत आणि विष्णु विशाल दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये कपिल देवची झलक पाहायला मिळते.

लाल सलाम आहे तरी काय?

ऐश्वर्या रजनीकांतनं दिग्दर्शित आणि लायका प्रॉडक्शनच्या वतीनं निर्मित रजनीकांतच्या यांच्या या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामध्ये त्यांनी मोईद्दीन भाई ची भूमिका साकारली आहे. यापूर्वी त्याच्या टीझरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चित्रपट क्रिकेट आणि मोईद्दीन भाई यांच्या अवतीभोवती फिरताना दिसते. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान असून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

गेल्या वर्षी या चित्रपटाची निर्मिती सुरु झाली होती. तो आता येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे शुटींग मुंबई, चैन्नई आणि पॉडेचेरीमध्ये झाले आहे. गेल्या वर्षी त्या चित्रपटाच्या सेटवरील कपिल देव आणि रजनीकांत यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com