बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडची जादू गायब, आमिर अन् अक्षयचे चित्रपट चालेना

बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडची जादू गायब
Laal Singh Chaddha And Raksha Bandhan
Laal Singh Chaddha And Raksha Bandhanesakal
Updated on

Laal Singh Chaddha And Raksha Bandhan Box Office : २०२२ हे वर्ष सुरु आहे. प्रेक्षक मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट पाहायला मिळणार यामुळे आनंदी होते. लालसिंग चड्ढा, गंगूबाई काठियावाडी, अक्षय कुमारबरोबर रक्षाबंधन साजरा करु, लग्न सोहळ्याच्या काळात जुग जुग, लाइगर येईल. पण या सर्वाचा परिणाम मात्र शून्य राहिला.

त्यामुळेच म्हणतात अपेक्षा फार ठेवू नये. २०२२ मध्ये बाॅलीवूडवर मोठे संकट घोंघवत आहे. २ ते ३ चित्रपट सोडले तर सर्व पडले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यात जे घडले ते धक्कादायक होते. ते जाणून घेऊया...

Laal Singh Chaddha And Raksha Bandhan
Amruta Khanvilkar : चंद्रमुखी अमृता खानविलकरची इच्छापूर्ती

बाॅक्स ऑफिसवर वाईट स्थिती

मागील महिन्यांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि बाॅक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकलेले नाही. मात्र ऑगस्ट महिन्यात आणखी वाईट स्थिती पाहायला मिळाली. या महिन्यात बाॅलीवूडची ए लिस्टेड अभिनेत्यांची मोठ्या बजेटची चित्रपट प्रदर्शित झाली. प्रचंड अपेक्षा असलेल्या या चित्रपटांमुळे बाॅक्स ऑफिसवरील मरगळ झटकेल असे समजले जात होते.

मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. लालसिंग चड्ढा, रक्षाबंधन, लाइगर, दोबारा ही चारही चित्रपटे आपटलीच. ओटीटीवर ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला आलियाचा चित्रपट डार्लिंग लोकांना आवडला. मात्र बाॅक्स ऑफिसच्या आकड्यांमध्ये तो सामील झाला नाही. (Bollywood Box Office News)

Laal Singh Chaddha And Raksha Bandhan
Ranveer Singh : न्यूड फोटोशूट वादावर रणवीर म्हणाला - अंदाज आला...

ऑगस्ट महिन्यात ४ मोठे चित्रपट आपटले

११ ऑगस्ट रोजी बाॅक्स ऑफिसवर आमिर खानच्या (Aamir Khan) लालसिंग चड्ढापासून फ्लाॅप होण्याचा सपाटा महिन्याच्या शेवटी २५ ऑगस्टला आलेल्या लाइगरपर्यंत सुरुच होते. लालसिंग चड्ढाने १९ दिवसात ५६.८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र १८० कोटींच्या बजेटने तयार केलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली कामगिरी करत आहे.

आमिरच्या चित्रपटाबरोबर प्रदर्शित अक्षय कुमारचा (Akshay Kumar) रक्षाबंधन ४३.२२ कोटींवरच अडकला आणि ५० कोटींचा आकडाही पार करु शकला नाही. मग १९ ऑगस्ट रोजी आलेला तापसी पन्नूचा चित्रपट कुठे गायब झाले हे कळालेच नाही. लाइगरने ४ दिवसांमध्ये कसे-बसे ३८ कोटींचा गल्ला जमवला आहे. या सर्व चित्रपटांमध्ये एक बाब समान आहे. त्यांना चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मिळत नसल्याने शोज रद्द करण्याची वेळ आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com