
Lalit Modi And Sushmita Sen Breakup Funny Memes Viral : ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यातील नातं पाहून आता चाहत्यांना प्रेम हे सोप नाही, बस्स तितक समजून घ्या ! हे वाक्य आठवत असेल. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुष्मिता सेन आणि ललित मोदी आपल्या नातेसंबंधांबाबत पुन्हा चर्चेत आले आहेत. दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत.
खरचं ब्रेकअप झालं का?
सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी आपल्यातील नात्यासंबंधांबाबत दुजोरा दिलेला आहे. आणि आताच दोघांच्याही ब्रेकअपची अफवाह चर्चेत आहे. मात्र सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांनी याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र ललित मोदींच्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरील काही बदल पाहून युजर्संना वाटत आहे, की दोन्ही सेलेब्स दरम्यान काही तर गडबड आहे.
गंमतीदार मीम्स व्हायरल
सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्यानंतर अनेक मीमर्स सक्रिय झाले आहेत. ते सोशल मीडियावर स्टार कपलच्या ब्रेकअपचे मजेदार मीम्स शेअर करित आहेत. युजर्स सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांची मजा घेत आहेत.
एका युजरने 'हम साथ साथ है' चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन सांगितले, की स्टार कपलच्या ब्रेकअपनंतर अविवाहित तरुण - ये तो सच है की भगवान है, हे गाण गात असतो. दुसऱ्या युजरचे मीम सांगतो, की ललित मोदींच्या सुष्मिता सेन हिचे नाव बायोतून डिलीट केल्यानंतर नेटिजन्स म्हणतात - समजल नाही, पण ऐकून चांगल वाटलं. (Bollywood News)