लारा दत्ताचं डेटिंग?; ट्रोल करणाऱ्यांना फटकारलं....

लाराने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
lara dutta
lara duttaesakal

बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ताने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. टेनिसपट्टू महेश भूपतीसोबत लग्न केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीतून काही काळ ब्रेक घेतला होता.पण ती आता पुन्हा चित्रपटांमध्ये काम करताना दिसतेय.तर सध्या लाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. एका डेंटिग अॅपवर तिचं प्रोफाईल दिसत असल्याने या चर्चा होत आहेत.त्यामुळे लारा दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

लारा दत्ता काय म्हणाली व्हिडीओमध्ये;

“कालपासून, माझ्या फीडमध्ये अनेक मीम्स आणि मेसेजेस येत आहे, त्यावरून मला समजलं माझं प्रोफाइल कोणत्यातरी डेटिंग अॅपवर आहे. मी कालपासून लोकांना उत्तरं देण्याचा आणि सत्य काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मला वाटलं मी ऑनलाइन येऊन तुमचे सगळे गैरसमज दूर करते. डेटिंग अॅपशी मला काहीही प्रॉब्लेब नाहीये. याद्वारे लोक भेटतात आणि आपला जोडीदार निवडतात. पण मी कोणतेही डेटिंग अॅप वापरत नाही. काही मीम्स पाहून मला पण खूप आश्चर्य वाटलं, पण तुम्हाला माझी प्रोफाइल डेटिंग अॅपमध्ये सापडणार नाही, तुम्हाला निराश केल्याबद्दल क्षमस्व. मी खूप कमी इन्स्टा लाइफ करते त्यामुळे आज येथे असलेल्या तुमच्या सर्वांशी कनेक्ट होण्यात खरोखर मजा येत आहे.”

lara dutta
पद्मश्री मिळताच कंगनाचं ट्रोलरला सडेतोड उत्तर

लारा शेवटची बेल बॉटम या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात लाराने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. लाराच्या लूक आणि अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही लाराचे कौतुक झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com