दीदींचं खरं नाव काय होतं माहितीये?

 लता मंगेशकर
लता मंगेशकरTribute to Lataji

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्यप्रदेशातील इंदौर येथे एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) शास्त्रीय गायक (Classical Singer) आणि थिएटर कलावंत होते, त्यामुळे लतादिदींना संगिताचे बाळकडु कुटुंबातुनच मिळाले होते. स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द गायिका आहेत.

लता दिदी यांचे खरे नाव हे दुसरे आहे. जे की काहींनी त्याबद्दल माहिती नाहीयेय. त्यांचे नाव कसे आणि का बददले हे अनेकांना माहित नाही. त्यांचे खरे नाव हेमा हार्डीकर (Hema Hardikar) होते. त्यांच्या वडिलांनी आडनाव बदलून मंगेशकर केले, तर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना लता दिदींचे नाव बदलण्यात आले. “लतीका” (Latika) हे त्यांच्या वडिलांचे नाटक ‘भाऊ बंधन’मधील एक लोकप्रिय चरित्र आहे. यावरूनच त्यांचं नाव 'लता' ठेवण्यात आले.

लता दीदींचे वडील पंडित दीनानाथ यांचे आडनाव हर्डीकर होते ते बदलून त्यांनी मंगेशकर केले. ते गोव्यातील मंगेशी येथील रहिवासी होते आणि त्या आधारावर त्यांनी आपले नवीन आडनाव निवडले. लतादीदींच्या जन्माच्या वेळी त्यांचे नाव हेमा होते जे बदलून लता असे ठेवण्यात आले. हे नाव वडील दीनानाथ यांना त्यांच्या 'भावबंधन' नाटकातील लतिका या स्त्री पात्राच्या नावावरून पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com