अजूनही गायला आवडेलच, पण...

गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. सोशल मीडियापासून सर्वत्र सध्या या महान गायिकेची चर्चा आहे. याच वर्षी त्यांनी इंडस्ट्रीतील आपली 75 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने आज माध्यमांशी लताबाई बोलल्या. त्या म्हणाल्या, अजूनही काही चांगलं माझ्याकडे आलं तर मला गायला आवडेल. जे जे चांगलं ते ते मी गाईन, पण आता मला सिनेमासाठी मात्र गायचं नाही. लताबाईंनी असं सांगून यापुढे सिनेसंगीतात आपल्याला हा आवाज आता ऐकता येणार नाही याची हळहळही उपस्थितांना वाटली. 

मुंबई : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. सोशल मीडियापासून सर्वत्र सध्या या महान गायिकेची चर्चा आहे. याच वर्षी त्यांनी इंडस्ट्रीतील आपली 75 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने आज माध्यमांशी लताबाई बोलल्या. त्या म्हणाल्या, अजूनही काही चांगलं माझ्याकडे आलं तर मला गायला आवडेल. जे जे चांगलं ते ते मी गाईन, पण आता मला सिनेमासाठी मात्र गायचं नाही. लताबाईंनी असं सांगून यापुढे सिनेसंगीतात आपल्याला हा आवाज आता ऐकता येणार नाही याची हळहळही उपस्थितांना वाटली. 

यावेळी बोलताना लताबाई म्हणाल्या, उद्या मला खरंच काही चांगलं गायची संधी मिळाली तर मी गाईन. पण आता मी सिनेसंगीत गाणार नाही. नाॅनफिल्मी असं काही माझ्याकडे आलं त्यातही भक्तीसंगीतासारखं काही नव्या चालीतून तयार होत असेल, तर मला माझा आवाज त्यासाठी द्यायला आवडेल. 

Web Title: Lata Mangeshkar anniversary esakal news