'लता मंगेशकरांनी कुटुंबासाठी 'तो' निर्णय घेतला होता'- शत्रुघ्न सिन्हा

स्वरसम्राज्ञींच्या अनेक आठवणी त्यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितल्या आहेत.
Lata Mangeshkar, Shatrughan Sinha
Lata Mangeshkar, Shatrughan SinhaGoogle

आज भारतरत्न लता मंगेशकर(Lata Mangeshkar) जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या गाण्यांचा-आठवणींचा खजिना मात्र आपल्याकडे भरपूर आहे. जोपर्यंत जग आहे तोपर्यंत तो खजिना अजरामर राहणार यात दुमत नाही. लता मंगेशकर यांची प्राणज्योत ६ फेब्रुवारी २०२२ रोजी मालवली. त्यांच्या निधनानंतर केवळ भारतातून नाही तर संपूर्ण जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. अगदी पाकिस्तानातूनही त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केलेला आपण पाहिला आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लता दीदींच्या काही आठवणींना उजाळा देताना अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी लता मंगेशकर यांच्या लग्नाविषयी मोठी गोष्ट सांगितली आहे.

Lata Mangeshkar, Shatrughan Sinha
हृतिक रोशनने चक्क सोशल मीडियावर पूर्वाश्रमीच्या पत्नीची उडवली खिल्ली

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की,''लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबावरचं प्रेम दिसून येतं. त्याचा खरंतर सम्मान आपण सर्वांनी करायला हवा'' असंही ते म्हणाले.पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,''लता मंगेशकर माझ्या फॅन होत्या. त्यांना मी ज्या पद्धतीनं संवादफेक करायचो ते फार आवडायचे. मी कायम त्यांच्याशी ,त्यांच्या कुटुंबाशी संपर्कात असायचो. माझा मुलगा कुशच्या लग्नात त्यांनी माझी सून,माझी बायको आणि मला सगळ्यांना कपडे भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या''.

Lata Mangeshkar, Shatrughan Sinha
जेव्हा सलमान एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईच्या मांडीवर विसावतो तेव्हा..

''पारंपरिक पद्धत कोण आजकाल जपतं पण त्यांनी मात्र रीतसर सगळं केलं होतं''. याव्यतिरिक्त लता मंगेशकर यांच्याविषयी शत्रुघ्न सिन्हा यांनी भरपूर आठवणी सांगितल्या आहेत. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती,त्यात न्युमोनियाही झाला आणि जवळ-जवळ २९ दिवस मृत्युशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. पण म्हणतात ना जो आवडे सर्वांना,तोची आवडे देवाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com