'चाय से ज्यादा किटली गरम', लता दीदींच्या अंत्यसंस्काराबाबत हेमांगीची पोस्ट

Hemangi on Lata Mangeshkar Funeral
Hemangi on Lata Mangeshkar Funerale sakal
Summary

''तुम्ही कुणीही सेलिब्रिटी असला तरी आत तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलिस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या.''

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क (Lata Mangeshkar Funeral) येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठीतील कलाकार दिसले नाहीत, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यात. पण, ''शिवाजी पार्कवर नुसता सावळा गोंधळ होता. दोन महिला पोलिस अधिकारी एकमेकांना टाळी देत हसत होत्या. काही हिंदीतील कलाकारांना जाऊ दिलं, तर पण मराठी पोलिसांनी आम्हाला रोखलं. शेवटी गोष्ट भांडणापर्यंत आली. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला लता दीदींच्या पार्थिवापर्यंत जाऊ दिलं. एकंदरीत चाय से ज्यादा किटली गरम असा प्रकार होता'', असे अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितलं आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

हेमांगीची पोस्ट नेमकी काय? -

''माझी कलाकार म्हणून ओळख पटूनही हिंदीतल्या लोकांनी नाही, तर मराठी असलेल्या आणि ओळखत असलेल्या मराठी पोलिसांनी मला आत जाण्यास मनाई केली. ही चूक हिंदी बॉलीवूडची आहे का? शाहरुख खान तर म्हणाला नसेल या मराठी लोकांना आत सोडू नका? राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे, त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे आत सोडण्यास मनाई केली. बरं त्यातही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व प्रवेशद्वारावर मनाई केली. ती का केली हे पोलिसच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. खूप प्रयत्न करून आत गेल्यानंतर पाहिलं तर तिथले पोलिस हिंदीतल्या गायक मंडळींना सुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांना देखील शेवटपर्यंत थांबवूनच ठेवण्यात आलं'', असंही हेमांगीनं सांगितलं.

''हिंदीतल्या विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरलाही इतर बॉलीवूड अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही, थांबवून ठेवलं. उशिराने आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी, रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं. त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता. कोरोनामुळे तशीही फार गर्दी नव्हती. सगळे सौजन्याने वागत होते. शांतीपूर्ण वातावरण होतं. सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही. तुम्ही कुणीही सेलिब्रिटी असला तरी आत तुम्हांला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलिस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या. तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हाला पुन्हा अडवलं तेही मराठी पोलिसांनी! यात चूक त्या हिंदी कलाकारांची? गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हाला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोचल्यावर ना कुणी अडवलं ना हटकलं. अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊ दिलं. हवा तितका वेळ थांबू दिलं! मंगेशकर कुटुंबियांसोबत उभं केलं. पण प्रवेशद्वारापासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे 'चाय से ज्यादा किटली गरम' हाच होता! मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलिस पाळत होते आणि सरकारी प्रोटोकॉल्स अर्थाने पाहिलंय. पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी, शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं! कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्वाची वाटली याला bollywood कसं जबाबदार?'' असा सवालही हेमांगीनं उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com