
'ऐ मेरे वतन के लोगों' गाण्यास लतादीदींनी दिला होता नकार,कारण...
Lata Mangeshkar: कवी प्रदीप (Pradeep) यांनी लिहिलेलं हे अलौकिक गाणं (Song) त्यांनी आपली बहीण आशा भोसलेंसह (Aasha Bhosale) 'ड्यूएट' रेकॉर्ड करावं, अशी लतादीदींची (Lata Mangeshkar) इच्छा होती. परंतु कवी प्रदीपजींनुसार लता दीदींच्या आवाजात जी भावना आहे ती इतर कोणालाही जमणार नाही, म्हणून ते गाणं फक्त लता दीदींनीच रेकॉर्ड करावं असं प्रदीपजींचं ठाम मत होतं. त्यामुळे आशा भोसलेंनी या प्रोजेक्ट मधून माघार घेतली. अहोरात्र काम करत असताना एका गाण्याकडे विशेष लक्ष देणं अशक्य वाटतं, असं सांगत लतादीदींनीही गाण्यास नकार दिला. (Lata Mangeshkar refused to sing 'Ae Mere Watan Ke Logon')
हेही वाचा: लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक
हेही वाचा: Lata Mangeshkar: 'मेरा साया साथ होगा': गानसरस्वती लता दीदींचे निधन
संगीतकार-गायक हेमंत कुमार (Hemant Kumar) यांनी खरंतर संपूर्ण 'ऐ मेरे वतन के लोगों' हा प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांनीच लता दीदींना हे गाणं गाण्यासाठी तयार केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर काही काळातच लिहिलेल्या या ऐतिहासिक गीताने जनतेला एकत्र आणण्याची विलक्षण कामगिरी केली. दीदींनी हे गाणं गातेवेळची त्यांची मनस्थिती व्यक्त करताना काही गोष्टींचा खुलासा केला होता.
हेही वाचा: लता दीदी हीच माझी प्रेरणा : उषा मंगेशकर
हेही वाचा: Lata Mangeshkar: गानकोकीळा लता दीदींचं प्रत्येक गाणं सुपर हिट होतं अन् राहिल...
दीदी म्हणाल्या की, " हे गाणं कोणत्याही चित्रपटाचा भाग नसल्यामुळे त्याचा परिणाम मर्यादितच होईल असं मला वाटलं होतं, परंतु 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गीत माझं 'सिग्नेचर ट्यून'च बनलं. जोपर्यंत मी ते गात नाही तोपर्यंत माझा कोणताही कार्यक्रम, मैफिल पूर्ण होत नाही."
Web Title: Lata Mangeshkar Never Thought The Song Would Become So Popular
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..