वाढदिवस साजरा करण्याबाबत लता दीदी म्हणाल्या...

भारताच्या गानकोकिळा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी य़ांचा आज जन्मदिवस आहे.
लहान असतानाच दीदी गायल्या लागल्या. त्यांच्या आवाजानं देशातील संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेतला. आजही त्यांची सुरावट ऐकली की आपण वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो. दीदी आज त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

मुंबई - भारताच्या गानकोकिळा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी य़ांचा आज जन्मदिवस आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत. भाषा, प्रांत यांच्या सीमा ओलांडून लता दीदींच्या गाण्यावर प्रेम करणारे असंख्य श्रोते आहेत. आज त्या आपला 92 वा जन्मदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्तानं त्यांना बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता दीदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दीदींच्या गाण्याला प्रेरणास्त्रोत मानलं आहे. त्या आवाजानं कित्येकांना बळ दिलं. कित्येकांच्या मनात प्रेरणा निर्माण केली असं त्यांनी म्हटलं आहे.

यासगळ्या पार्श्वभूमीवर दीदींनी मात्र आपल्याला जन्मदिवस (92nd birthday of Lata Mangeshkar) साजरा करायचा नाही. असं सांगितलं आहे. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या एका वृत्तानुसार असं सांगण्यात आलं आहे की, गेल्या वर्षीप्रमाणं दीदी यावर्षीही देखील आपण जन्मदिन साजरा करणार नाही. त्याचं कारण सांगताना दीदींनी सांगितलं की, सध्या सभोवताली कोरोनाचं संकट आहे. ते संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आपण अजून ते संकट दूर न झाल्यानं कोणत्याही प्रकारे जन्मदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितलं आहे. कोरोनाच्या काळात माझा हा दुसरा जन्मदिवस आहे. त्यामुळे मी यावेळी देखील जन्मदिन साजरा करणार नाही. माझ्या परिवारातील लोकं माझ्यासोबत आहे हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

अजूनही परिस्थिती गंभीर आहे. कोरोनापासून अनेकांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या नातेवाईकांची भेट घेतलेली नाही. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. अशावेळी मी केक कापणं आणि कँडलवर फुंक मारणं कितपत योग्य़ आहे, असा प्रश्न दीदींनी उपस्थित केला आहे. मला असे वाटते की, शक्य तितक्या लवकर हा व्हायरस आपल्या आयुष्यातून जायला हवा. अनेकांना त्याचा खूप त्रास झाला आहे. हा अतिशय जीवघेणा आजार आहे. कित्येकजण डिप्रेशनमध्य़े गेले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आपल्या सर्वांचे जगणे बदलले आहे. त्यामुळे आपण कुणीही या आजाराकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचे आहे. असेही दीदींनी सांगितलं.

लहान असतानाच दीदी गायल्या लागल्या. त्यांच्या आवाजानं देशातील संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेतला. आजही त्यांची सुरावट ऐकली की आपण वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो. दीदी आज त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
"..तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल"; शिवलीलाने सुनावलं
लहान असतानाच दीदी गायल्या लागल्या. त्यांच्या आवाजानं देशातील संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेतला. आजही त्यांची सुरावट ऐकली की आपण वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो. दीदी आज त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
'निर्लज्ज आंटी' म्हणणाऱ्या ट्रोलरला जिनिलियाचं सडेतोड उत्तर, पहा व्हिडीओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com