
'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत राजश्री माहेश्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता सबरवालने मालिकांमध्ये काम करणं सोडून दिलं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली. 'यापुढे डेली सोप्समध्ये काम करणार नाही. पण वेब सीरिज, चित्रपट आणि कुठे पाहुण्या कलाकाराची भूमिका असेल तर नक्कीच करेन', असं तिने स्पष्ट केलं. लताने अचानकच मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.
'द टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "लॉकडाउनमध्ये मला स्वत:बद्दल विचार करण्यासाठी फार वेळ मिळाला. तेव्हाच मला समजलं की माझी प्रायोरिटी आता बदलली आहे. मला नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मला माझ्या साडेसात वर्षांच्या मुलाला वेळ द्यायचा आहे, त्याला अभ्यासात मदत करायची आहे." असं असलं तरी लताने अभिनयक्षेत्र सोडलेलं नाही. मानधन कमी मिळालं तरी चालेल पण आता छोटे छोटे प्रोजेक्ट्सच करीन, असं ती म्हणाली.
लता मेकअप ट्युटोरिअल्सचे व्हिडीओ शूट करून तिच्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. कुटुंबीयांना वेळ देत काम करता यावं अशी तिची इच्छा आहे. मालिकांसाठी फार वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होतं, म्हणूनच तिने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लताने 'शका लका बुम बुम', 'वो रहनेवाली महलों की', 'वो अपना सा', 'झूट बोले कौआँ काटे' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. त्याचसोबत तिने 'विवाह', 'इश्क विश्क' या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.