esakal | मिया खलिफाने प्रियांकावर साधला निशाणा, 'मिसेस जोनास काही बोलणार की नाही?'
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra and mia khalifa

मिया खलिफाचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत

मिया खलिफाने प्रियांकावर साधला निशाणा, 'मिसेस जोनास काही बोलणार की नाही?'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

राजधानी दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांवर अडल्ट स्टार मिया खलिफाने अभिनेत्री प्रियांका चोप्रावर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून मिया खलिका ट्विटरवर फार चर्चेत आहे. नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये तिने 'देसी गर्ल'ला सवाल केला आहे. 'मिसेस जोनास काही बोलणार की नाही', असा प्रश्न मियाने प्रियांकाला विचारला. 

विख्यात पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांसारख्या बाहेरच्या सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र बॉलिवूड सेलिब्रिटी त्याबद्दल अजूनही शांत का आहेत, असा सवाल मियाने केला. मियाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं, 'मिसेस जोनास काही बोलणार आहेत की नाही? मला सहजच हे जाणून घ्यायची इच्छा होतेय.'

हेही वाचा : "पॉर्न नव्हे तर कामुक विषयावर शूटिंग करत होतो"; गहना वशिष्ठच्या टीमचं स्पष्टीकरण

प्रियांका चोप्राने शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केलं होतं. 'आपले शेतकरी हे देशाचे फूड सोल्जर आहेत. त्यांची भीती घालवणे गरजेचे आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. एक सशक्त लोकशाही म्हणून आपल्याला हे प्रयत्न करणे गरजेचे आहे', असं प्रियांकाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या या ट्विटनंतर अभिनेत्री कंगना रणौतने तिला खडेबोल सुनावले होते.