Remembering KK: ज्या ठिकाणी शेवटचं गायला त्याच ठिकाणी उभारला KK चा पुतळा, भावुक करणारा क्षण

संगीतकार कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच KK. काल KK ची पहिली पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने एक भावुक करणारा क्षण घडलाय.
Remembering KK, KK tribute, KK statue in gurudas college
Remembering KK, KK tribute, KK statue in gurudas collegeSAKAL

KK Statue in Gurudas College News: बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची अकाली एक्झिट चटका लावून गेली. या कलाकारांची आठवण आली की नकळत डोळ्यात पाणी येतं.

बॉलिवूडमधला अशाच एका कलाकाराने अकाली जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण देश हादरला. हा कलाकार म्हणजे गायक आणि संगीतकार कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच KK. काल KK ची पहिली पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने एक भावुक करणारा क्षण घडलाय.

(Late singer KK's statue installed in Gurudas College in Kolkata, where his last concert was held)

Remembering KK, KK tribute, KK statue in gurudas college
किती देखणं असावं रितीकाला विचारावं! Ritika Shrotri

KK ची काल पहिली पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने देशभरात ठिकठिकाणी चाहत्यांनी KK ला सांगीतिक मानवंदना दिली. अशातच एक सर्वात खास गोष्ट घडली.

कोलकाता येथील कॉलेज होते जिथे गायक KK ने शेवटची कॉन्सर्ट केली होती, तिथे KK च्या स्मरणार्थ पुतळा बसवण्यात आला होता.

KK च्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोलकाताच्या गुरुदास कॉलेजमध्ये सिंगर KK चा पुतळा बसवण्यात आला. हे तेच कॉलेज आहे जिथे KK ने त्याच्या आयुष्यातला शेवटचा परफॉर्मन्स दिला होता.

ANI ने एक व्हिडिओ शेअर करताना याबाबत माहिती दिली आहे. ANI ने ट्विटमध्ये लिहिले की, "दिवंगत गायक केके यांचा पुतळा कोलकाता येथील गुरुदास कॉलेजमध्ये स्थापित करण्यात आला.

याच ठिकाणी KK यांची शेवटची कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षी ३१ मे रोजी याच महाविद्यालयातील एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने KK यांचे निधन झाले."

Remembering KK, KK tribute, KK statue in gurudas college
Sameer Wankhede Case: मी शेंगा खाल्ल्या नाहीत.. नवऱ्याच्या प्रकरणावरुन क्रांती पुन्हा बरसली

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे आहेत. केके यांच्या पुतळ्याला विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कॉलेज प्रशासनानेही या भावुक सोहळ्याला संगीतमय टच दिला.

ANI शी बोलताना स्थानिक नगरसेवक अमल चक्रवर्ती म्हणाले, 'केके हा सुरेल आवाजाचा जादूई माणूस होता. गुरुदास कॉलेजची मैफल ही त्यांची शेवटची मैफल होती हे खूप वाईट वाटतं. दिवंगत गायक KK यांनी गेल्या वर्षी ३१ मे रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला."

Remembering KK, KK tribute, KK statue in gurudas college
Sara Ali Khan: मी मंदिरात जाणारच..! ट्रोल झाल्यानंतर सारा अली खानचं मोठं वक्तव्य

कोलकाता येथील नजरुल मंच येथे कॉलेज फेस्टमध्ये परफॉर्म करत असताना 53 वर्षीय गायका KK चा मृत्यू झाला.

गायना दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर, त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पुढे चौकशी समिती बसवण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com