esakal | प्रसिध्द संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Vanraj Bhatitya

प्रसिध्द संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर हुकूमत असलेले संगीतकार म्हणून प्रसिध्द असणारे संगीतकार वनराज भाटिया (vanraj bhatia) यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या संगीतामुळे भाटिया यांचे नाव सर्वश्रृत होते. त्यांचे संगीतातले काम मोठे होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. संगीताच्या बाबत एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी त्यांनी विकसित केली होती. भाटिया यांनी दिल्लीतील विश्वविद्यालयात संगीत हा विषय पाच वर्षे शिकवला. ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.

भाटिया (vanraj bhatia) यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. भारतात समांतर चित्रपटाची चळवळ राबविण्यात मोठे योगदान असणारे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अंकुर चित्रपटापासून भाटिया यांच्या संगीतप्रवासाला सुरुवात झाली. जाहिरात क्षेत्रातही त्यांनी विशेष योगदान होते. गेल्या काही दिवसांपासून भाटिया (vanraj bhatia) यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. त्यासाठी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल

हेही वाचा: असं आहे आदर पुनावालांचं मलायका, करिनासोबतचं कनेक्शन

शेवटी भाटिया (vanraj bhatia) यांनी दक्षिण मुंबईतील आपल्या घरी शेवटचा श्वास घेतला. मंथन, भूमिका, जाने भी दो यारो, 36 चौरंगी लेन आणि द्रोहकाल सारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. भाटिया यांना 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमस मालिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना 1989 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता. 2012 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.