
Liger promotion: विजयला पाहून काही रडल्या तर काही बेशुद्ध पडल्या, शेवटी..
Vijay Deverakonda : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचा लायगर (Liger) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात विजयसोबतच अनन्या पांडे (Ananya Panday) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. मागे या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते ज्यामध्ये विजय न्यूड पोज मध्ये होता. त्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याचं कारण ठरलंय चित्रपटाचं प्रमोशन..
विजय आणि अनन्या सध्या लायगर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेट देत आहेत. गेल्या काही दिवसात विजयचा चाहता वर्ग झपाट्याने वाढत आहे. याची प्रचिती रविवारी 31 जुलै रोजी नवी मुंबई येथील एका मॉल मध्ये आली. नुकताच तो प्रमोशनसाठी नवी मुंबईमधील एका मॉलमध्ये गेला होता त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी अक्षरशः गर्दी केली. यावेळी विजयला पाहून चाहते भारावून जात होते.
विजय देवरकोंडा नवी मुंबईतील एका मॉलमध्ये प्रमोशनसाठी गेला होता. जिथे त्याला पाहण्यासाठी हजारो लोक आले होते. मॉलच्या मधोमध बांधलेल्या स्टेजवर विजय येताच प्रेक्षकांनी विजयच्या नावाचा जयघोष केला. अनेकांनी विजायकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. गर्दी अनियंत्रित होऊ लागली. काही मुली रडत होत्या तर काही कोसळत होत्या. एका रिपोर्टनुसार, विजय स्टेजवर येताच सर्वत्र आवाज येऊ लागले. अनेक चाहत्यांनी विजयचे पोस्टर आणि स्केचेस आणले होते. काही चाहते बॅरिकेड्सला धक्का देऊन स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून आयोजकांना धक्काच बसला.एका महिलेला तर गर्दीमध्ये भोवळ आली. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जातेय हे लक्षात येताच विजय आणि अनन्या हे इव्हेंटमधून निघून गेले. त्यामुळे प्रमोशन मध्येच थांबवावे लागले.