रिव्ह्यू Live : भेटली तू पुन्हा : लांबलेली भेट

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
शुक्रवार, 28 जुलै 2017

पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादी या एव्हरग्रीन जोडीला सोबत घेऊन दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी नवा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाचे नाव आहे भेटली तू पुन्हा. चांगली संकल्पना असूनही त्याचा विस्तार योग्य न झाल्याने हा चित्रपट कमालीचा लांबला आहे. कथानकाचा जीव तासाभराचा असताना तो दोन तास केल्याने जो फटका बसणे अपेक्षित असतं, तसंच काहीसं झालं आहे. या चित्रपटाला ई सकाळने दिले 1 चीअर्स. 

पुणे: पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादी या एव्हरग्रीन जोडीला सोबत घेऊन दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी नवा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाचे नाव आहे भेटली तू पुन्हा. चांगली संकल्पना असूनही त्याचा विस्तार योग्य न झाल्याने हा चित्रपट कमालीचा लांबला आहे. कथानकाचा जीव तासाभराचा असताना तो दोन तास केल्याने जो फटका बसणे अपेक्षित असतं, तसंच काहीसं झालं आहे. या चित्रपटाला ई सकाळने दिले 1 चीअर्स. 

रिव्ह्यू : भेटली तू पुन्हा :Live

या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू पुण्याच्या सिटीप्राईडमधून करण्यात आला. यात कलाकारांना सहभागी होता आले नाही. या चित्रपटाचे कथानक काहीसे असे, चित्रपटाचा नायक अलोकला घरच्यानी लग्नाची घाई केली आहे. 34 स्थळे बघून झाल्यानंतर 35वे स्थळ अश्विनीचे आले आहे. पण पहिल्याच भेटीत हे स्थळ अलोकने नाकारले आहे. त्यानंतर एका अनपेक्षितवेळी अश्विनी आणि त्याची भेट एका रेल्वेत होते. त्यानंतर दोघांचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात उलगडत जाणारी ही कहाणी आहे. 

वैभव, पूजाने यात चोख अभिनय केला आहे. पण पटकथेत फार करण्यालायक नसल्याने त्यांच्या अभिनयावर मर्यादा आल्या आहेत. मुळात आयुष्य एक होताना या एकांकिकेवर हा चित्रपट बेतला आहे. हे माध्यमांतर करताना सिनेमासाठी आवश्यक गोष्टींचा, नव्या प्रसंगांचा समावेश यात होणं आवश्यक होतं. तसं न झाल्याने उत्तरार्ध कमालीचा लांबतो. 

दिग्दर्शक कणसे यांनी दगडीचाळसारखा परिपूर्ण चित्रपट दिला आहे. चित्रपट या माध्यमाचा अंदाज त्यांना आहे. या चित्रपटाची संकल्पनाही उत्तम आहे. पण, त्याचा विस्तार अधिक सकस केला असता तर ही भेट आणखी आकर्षक झाली असती. वैभव आणि पूजाच्या चाहत्यांसाठी मात्र हा चित्रपट पर्वणी आहे. त्यांनी हा चित्रपट पाहायला हरकत नाही.  

Web Title: live review Bhetakli tu punha esakal news