
वीस लाखांची रोकड उचलून मूनव्वर फारूकी ठरला ‘लॉक अप’ चा विजेता..
lock upp winner : बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंगनाचा लॉक अप (Lock Upp) नावाचा शो गेली सत्तर दिवस भलताच चर्चेत होता. त्यामधील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. रोज नवे सत्य, नवे रहस्य आणि वाद यामुळे या शोकडे अनेकांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे हा शो अंतिम टप्प्यात आल्या पासून लॉक अप चा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झाली आणि लॉक अप जे विजेतेपद पटकावणारा 'तो' समोर आला.
गेली सत्तर दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कॉमेडियन मुनव्वर फारुकी ( comedian Munawar Faruqui) हा लॉक अप चा विजेता झाला आहे. मुनव्वर फारुकी हा सुरुवातीपासूनच या खेळाचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात होते. मुनव्वर विजेता होईल असा अंदाज अनेकांनी बांधला होता. त्याच्या स्वभावाने आणि खरेपणाने चाहत्यांची मनं जिंकली होती. लॉक अपमध्ये जाताच मुनव्वर याने आपली खरी बाजू खरी प्रेक्षकांसमोर ठेवली. त्याने आजवर बराच संघर्ष केला आहे. या शो मध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा धक्कादायक माहिती दिली. सत्तर दिवसात मुनव्वरने प्रेक्षक आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत लॉक अप च्या विजेते पदावर आपलं नाव कोरलं.
प्रिन्स नरुला, मुनव्वर फारुकी, पायल रोहतगी, अंजली अरोरा, शिवम शर्मा, आजमा फल्लाह हे या शोच्या अंतिम फेरीत दाखल झाले होते. ‘टॉप 6’मध्ये स्थान मिळवलेल्या या सहा जणांमध्ये अत्यंत सुरशीची स्पर्धा होती. शोच्या फिनालेमध्ये सर्व स्पर्धकांनी कसून प्रयत्न केले. ग्रँड फिनालेमध्ये तर स्पर्धकांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स दिले. मात्र, बाकी सर्व स्पर्धकांना मागे टाकत मुनव्वरने ही ट्रॉफी जिंकली.
मुनव्ववरने विजेतेपदाची ट्रॉफी तर पटकावलीच त्या व्यतिरिक्त मुनव्वरला २० लाख रुपयांचे (munwar wins cash prize 20 lakh cash) रोख पारितोषिक, आर्टिगा गाडी आणि इटलीला जाण्याची संधी मिळाली. मुनव्वरने आयुष्यात बराच संघर्ष केला आहे. त्यामुळे ट्राॅफी जिंकल्यानंतर मुनव्वरच्या चेहऱ्यावरचा आनंद बरच काही सांगून गेला. त्याने या विजेतेपदाबाबत चाहत्यांचे आभारही मानले.