'तुझा विषय संपला' शिवमचा संताप: रागाच्या भरात पायल त्याच्यावर थुंकली|Lock Upp Kangana Ranaut Payal Rohatgi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lock upp News

'तुझा विषय संपला' शिवमचा संताप: रागाच्या भरात पायल त्याच्यावर थुंकली

Entertainment News: अभिनेत्री कंगनाचा लॉ़क अप नावाचा शो सध्या फॉर्मात आला आहे. (Actress Kangana Ranaut) त्याला कारण त्यामध्ये सहभागी झालेल्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी (Bollywood News) केलेले धक्कादायक खुलासे. एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे यामुळे लॉक अपनं प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद (Payal Rohatagi) मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून त्याच्या ग्रँड सेलिब्रेशनचे चाहत्यांना वेध लागले आहे. असे असताना देखील पायल रोहतगीनं तिच्या आक्रमक स्वभावानं नेटकऱ्यांना धक्का दिला आहे. तिनं जी कृती केली आहे त्यामुळे कंगनानं देखील तिच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पायलनं रागाच्या भरात शिवमवर थुंकल्यानं त्याचाही संताप झाल्याचे दिसून आले आहे.

कंगनाच्या लॉक अप नावाच्या मालिकेचे ग्रँड सेलिब्रेशन 5 मे रोजी आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कंगनाच्या या रियॅलिटी शो नं प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केल्याचे दिसून आले होते. त्यात सहभागी झालेल्या सायशा शिंदे, मुनव्वर फारुख, तेहसीन पुनावाला यांच्याशिवाय पुनम पांडे यांनी वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांचे मनोरंजनही केले आहे. त्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रातील इतर मालिकांवर झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अंजली अरोरा, सायशा शिंदे, शिवम शर्मा, नरुला आजमा हे कंगनाच्या लॉक अपमध्ये बंदिस्त आहेत. त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या खुलाशामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Lock Upp: प्रेग्नंसीबाबत पायल रोहतगीचा धक्कादायक खुलासा, 'नवऱ्याला तेव्हाच...'

लॉकअपच्या एका एपिसोडमध्ये शिवम शर्मा आणि पायल रोहतगी यांच्यात जोरदार भांडणं झाल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही स्पर्धकांनी लॉक अपच्या सर्वच नियमांचे उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर कारवाई कऱण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी कंगनावर केली आहे. आता यासगळ्यात कंगना या कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ल़ॉक अपचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात पायल आणि शिवम यांच्यात भांडणं झाल्याचे दिसत आहे. हे दोन्ही स्पर्धक एकमेकांसमोर उभे राहून ओरडत असल्याचे दिसत आहे. त्यांचे ते भांडण एवढए टोकाला गेले की त्यामुळे इतर सहकाऱ्यांना त्याचा त्रास झाला. पायल आपल्या अंगावर थुंकल्यानं आता तिच्या या शोमधून विषय संपला. अशा प्रकारे शिवमनं आपला संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: lock upp : लहानपणी एका मुलाने मला.. लैंगिक अत्याचाराबाबत कंगनाचा खुलासा

Web Title: Lock Upp Kangana Ranaut Payal Rohatgi Spitting On Shivam Sharma Trolled Soicial Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top