
Lockupp: अंजलीनं सांगितला आत्महत्येचा 'तो' प्रसंग; ऐकून कंगनाही झाली शॉक
इंटरनेट सेन्सेशन असलेली अंजली अरोरा(Anjali Arora) कंगनाच्या(Kangana ranaut) 'लॉकअप'(Lockupp) मध्ये सध्या जेलची हाव खात आहे. मात्र जेलमध्ये राहूनही तिची चर्चा रंगताना दिसतेय. फिनालेच्या दिशेनं शो चा प्रवास सुरू असताना आता अंजली अरोरानं तिच्या आयुष्यातलं एक मोठं सीक्रेट सांगितलं अन् ते ऐकून सारेच स्तब्ध झाले. अंजली अरोरानं सांगितलं की,''जेव्हा ती ११ वी इयत्तेत होती तेव्हा तिनं स्वतःचं आयुष्य संपवण्याचं ठरवलं होतं''. अंजलीनं पुढे सांगितलं की,''एकदा तिच्या भावानं तिला हुक्का बारच्या लाउंजमध्ये पाहिलं होतं. त्यावेळी भावानं सगळ्यांसमोर तिला कानशिलात लगावली होती. तेव्हा अंजलीनं भावाला वडिलांना हे न सांगण्याची विनवणी केली होती,पण भावानं तिचं ऐकलं नाही''.
हेही वाचा: अजय देवगणला क्लॉस्ट्रोफोबिया; वाचा लिफ्टमध्ये गेल्यावर काय होतं अभिनेत्याला
अंजलीच्या भावानं तिच्या वडिलांना हे सगळं सांगून टाकलं. त्यानंतर अंजलीच्या वडीलांनी तिला घरातून बाहेर पडण्याविषयी नकार दिला. इतकंच नाही तर तिचं शिक्षणही थांबवलं. त्यादिवशी अंजलीनं जवळ-जवळ १ तास स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. ती फिनेल देखील प्यायली होती. त्यानंतर अंजलीच्या भावानं दरवाजा तोडून तिला बाहेर आणलं,तिच्यावर इलाज करण्यात आले. तिच्या आई-वडीलांनी,भावानं तिची माफीही मागितली होती. यानंतर कंगनानं आपला एक किस्सा शेअर केला आणि सांगितलं की, एकदा तिचं तिच्या कझीनसोबत भांडण झालं. जो कंगनाला तिनं कशाप्रकारचे कपडे घालावेत याविषी सांगत होता. यानंतर कंगनानं अंजलीला सांगितलं की तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला ते साफ चुकीचं होतं.
हेही वाचा: 'KGF 2' चं यश पाहून 'Pushpa 2' दिग्दर्शकानं थांबवलं शूट,घेतला मोठा निर्णय?
कंगनानं अंजलीला सल्ला देताना म्हटलं,''तु जे केलंस ते अयोग्य होतं. तुला जर वाटत असेल की तुझ्या अशा करण्याने आईला,वडिलांना,भावाला शहाणपण आलं,अद्दल घडली, तर तो तुझा समज चांगला नाही. हा असा गुण अनेक मुलांमध्ये पहायला मिळतो. आणि माझ्या मते असा समज ठाम चुकीचा आहे. तु असं करुन हिरो नाही बनलीस. तुझ्या या कृत्यानं दाखवून दिलं आहेस की तू किती दु्र्बल आणि घाबरट आहेस''.
Web Title: Lockupp Anjali Arora Reveals About Attempting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..