
'KGF 2' चं यश पाहून 'Pushpa 2' दिग्दर्शकानं थांबवलं शूट,घेतला मोठा निर्णय?
अल्लू अर्जुनचा(Allu Arjun) 'पुष्पा'(Pushpa) सिनेमा आता पॅन-इंडिया सेंसेशन बनला आहे. सिनेमानं त्याच्या हिंदी व्हर्जनसाठी मोठी कमाई केली आहे ही बातमी आता सर्वश्रुत आहे. 'पुष्पा' सिनेमाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी सिनेमाचा दुसरा भाग काढण्याची घोषणा केली होती. पुष्पा २ मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हेच कलाकार असणार आहेत. गेल्या काही दिवसांत मीडियामधून काही बातम्या कानावर पडत आहे की 'पुष्पा २' चं शूटिंग सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी थांबवलं आहे. आणि याचं कारण आहे 'केजीएफ चॅप्टर २'. बोललं जात होतं की 'केजीएफ २' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर 'पुष्पा २' सिनेमाची स्क्रिप्ट बदलली गेली आहे. पण आता सिनेमाच्या दिग्दर्शक-निर्मात्यांकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.
हेही वाचा: अजान-हनुमान चालिसा वादात भजन सम्राट अनुप जलोटा यांची उडी; म्हणाले...
पुष्पाचे निर्माते वाई रविशंकर यांनी या सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटल आहे. त्यांनी म्हटलं आहे की,''त्यांच्याकडे पहिल्यापासूनच इतकी उत्तम स्क्रिप्ट आहे की तिच्यात बदल करण्याचा काही संबंधच नाही.'' एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रविशंकर म्हणाले,''असं काहीच नाही. 'केजीएफ २' ने असं काय केलं आहे की ज्यामुळे आमच्या 'पुष्पा २' वर त्याचा परिणाम होईल? काहीच बदल झालेला नाही,काहीच नाही. आमच्याकडे पहिल्यापासूनच उत्तम स्क्रिप्ट आहे,आम्हाला स्क्रीप्ट बदलायची काय गरज? सुकुमार यांनी जी स्क्रिप्ट लिहिली आहे ती खूपच सुंदर आहे आणि ते स्वतः खूप चांगल्या पद्धतीनं तो सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत. दीड महिन्यांपासून आम्ही लोकेशनचा शोध घेत आहोत. आम्ही त्याच जंगलात शूट करत आहोत जिथे पहिल्या भागाचं शूटिंग झालं होतं''.
हेही वाचा: अजय देवगणला क्लॉस्ट्रोफोबिया; वाचा लिफ्टमध्ये गेल्यावर काय होतं अभिनेत्याला
याआधी बातमी होती की 'केजीएफ २' नंतर 'पुष्पा २' चे निर्माते-दिग्दर्शक सिनेमातील अॅक्शन सीन्स आधीच्या भागातील सीन्सपेक्षा अधिक मोठ्या स्वरुपात दाखवणार आहेत. 'पुष्पा २' सिनेमा यावर्षात १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग १७ डिसेंबर रोजी सिनेमागृहात भेटीस आला होता.
Web Title: Sukumar Making Changes To Pushpa 2 Script Post Yashs Kgf 2 Success Producer Y Ravi Shankar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..