अजय देवगणला क्लॉस्ट्रोफोबिया; वाचा लिफ्टमध्ये गेल्यावर काय होतं अभिनेत्याला Ajay Devgan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgan

अजय देवगणला क्लॉस्ट्रोफोबिया; वाचा लिफ्टमध्ये गेल्यावर काय होतं अभिनेत्याला

अजय देवगणचा(Ajay Devgan) Runway 34 हा सिनेमा 29 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत. या सिनेमात अजय देवगणसोबतच अमिताभ बच्चन,रकुल प्रीत सिंग महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अजय देवगणनं स्वतः केलं आहे. आता अजयनं या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आपल्या सर्वात मोठ्या भीतीचा खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं आहे की,त्याला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते आणि ती भीती कुठल्या प्रसंगामुळे आजतागायत वाटत आहे. तर मग चला जाणून घेऊया अजय देवगणच्या त्या भीतीविषयी.

हेही वाचा: मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात;'या' आजारानं आहेत त्रस्त, जाणून घ्या हेल्थ अपडेट

अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग झी टीव्हीचा रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर्स' च्या सेटवर आपल्या 'Runway 34' सिनेमाच्या निमित्तानं प्रमोशनसाठी गेले होते. यावेळी दोन्ही कलाकारांनी खूप धमाल-मस्ती केलीच आणि तिथल्या काही मजेदार टास्कमध्ये सहभागही घेतला. याचवेळी अजयनं आपल्याला वाटणाऱ्या सगळ्यात मोठ्या भीतीचा खुलासा केला आहे,ज्याला ऐकून आपण सगळेच खूप हैराण व्हाल.

हेही वाचा: अजान-हनुमान चालिसा वादात भजन सम्राट अनुप जलोटा यांची उडी; म्हणाले...

अजय देवगणनं आपल्या भीतीविषयी सांगताना म्हटलं आहे,''काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी एका लिफ्टमध्ये होतो अन् अचानक लिफ्टचं कनेक्शन तूटलं आणि ती तिसऱ्या माळ्यावरुन थेट तळमजल्यावर जाऊन आदळली. नशीब बलवत्तर म्हणून त्यावेळी लिफ्टमध्ये असलेल्यांना काही गंभीर दुखापत झाली नाही. पण त्यावेळी सगळेजण त्या लिफ्टमध्ये जवळपास दीड तास फसले होते. यावेळी मला जाणवलं की मला क्लास्ट्रोफोबिया आहे. आता जेव्हा कधी मी लिफ्टमध्ये जातो तेव्हा मी कायम घाबरलेलो असतो,आणि ती भीती स्पष्ट माझ्या चेहऱ्यावर दिसते,त्या घटनेपासून मला लिफ्टचा फोबिया आहे''.

हेही वाचा: आयुषमान खुरानाची पत्नी म्हणते,'आमच्यासाठी सेक्स एक चांगला वर्कआऊट आहे'

अजय देवगणचे काही सिनेमे आता आपल्याला एका पाठोपाठ भेटीस येणारच आहेत. Runway 34 प्रदर्शित झाल्यानंतर अजय देवगण आता दुसऱ्या एका सिनेमाच्या शूटिंग मध्ये बिझी आहे. अभिनेत्याच्या लिस्टमध्ये 'मैदान','भोला','गोलमाल 5','सिंघम 3', 'रेड 2', 'दृश्यम 2', 'थॅंक गॉड' सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

Web Title: Ajay Makes Shocking Revelation About His Phobia Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top